पोलिसांनी फिल्मी स्टाइलने पाठलाग करून पकडली टोळी

रांजणगाव गणपती, ता. २२ फेब्रुवारी २०१६ (मुकुंद ढोबळे): रांजणगाव औद्यौगिक वसाहती जवळ एस्टिम कार मधे  दरोड्याच्या तयारीत असणाऱ्या अहमदनगर जिल्ह्यातील  पाच जणांच्या अट्टल गुन्हेगारांच्या सशस्त्र  टोळीला रांजणगाव पोलिसांनी फिल्मी स्टाईल पाठलाग करून पकडले आहे, अशी माहिती पोलिस निरीक्षक अशोक इंदलकर यांनी  दिली.

या प्रकरणी तौफिक सत्तार शेख (वय 29), शादाब जावेद शेख (वय १९ दोघे रा. वार्ड न.2 काजिबाबा रोड, श्रीरामपुर, अहमदनगर), नवाज़ राजू शेख (वय १९, वार्ड.न. 1 श्रीरामपू, अहमदनगर), योगेश राजेंद्र निकम (25, रा. कनगुर रोड, राहता, अहमदनगर), सुनिल शिवाजी भुजबळ (वय 28, मोहीनीराजनगर, कोपरगाव, अहमदनगर) या पाच जणांना अटक करण्यात आली आहे. त्यांच्याकडून एक रिव्हॉल्व्हर, चार जिवंत काड्तुसे, दोन जंबो चाकू अशी घातक शस्त्र  जप्त करण्यात आली अाहेत.

याबाबत रांजणगाव पोलिसांनी  दिलेल्या माहीतीनुसार, सतरा फेब्रुवारी रोजी पोलिस पथक गस्त घालत असतांना त्यातील पोलिस हवालदार प्रकाश माने यांना खब-यांकडून माहीती मिळाली की, कारेगाव येथील ओव्हन स्प्रिंग बेकरी जवळ एका पांढरी रंगाची एस्टिम कार मधे काही तरुण संशयास्पद असल्याचे समजले. यावरून गस्तीवर असणारे सहाय्यक पोलिस निरीक्षक एस. पी. क्षीरसागर, पो. ह. प्रकाश माने, पो. शि. मिलिंद देवरे, अमोल नलगे, किशोर तेलंग, राजू मोमीन, तुषार पंदारे या गस्तीवरील पथक कारेगाव येथे गेले असताना पोलिस आल्याचे लक्षात येताच एस्टिम कार मधील लोकांनी पळ काढला. यावेळी पोलिस पथकाने त्यांचा फिल्मी स्टाईलने पाठलाग सुरू केला. अखेर रांजणगाव येथील मोरया इलेक्ट्रॉनिक या दूकानच्या समोर पोलिस पथकाने कारला पकडले. यावेळी वरील पाचही आरोपींना ताब्यात घेतले.

याप्रकरणी वरील सर्व अटक केलेले पाच ही आरोपी अहमदनगर जिल्ह्यातील अट्टल गुन्हेगार असल्याचे पोलिस निरिक्षक इंदलकर यांनी सांगितले. या पुढील तपास पोलिस निरिक्षक अशोक इंदलकर करीत आहे.
Comment Box is loading comments...

Comment Box is loading comments...

संबंधित बातम्या