पिंपळे जगतापच्या जळीतग्रस्त कुटुंबास ग्रामस्थांकडून मदत

पिंपळे जगताप, ता.२४ फेब्रुवारी २०१६ (प्रतिनीधी) : येथील हरिश्‍चंद्र बाजीराव मुरकुटे यांच्या घराला अचानक लागलेल्या आगीत संपु्र्ण घरगुती साहित्य उद्ध्वस्त झाल्याने संपूर्ण कुटुंबच उघड्यावर आलेले होते. मात्र, येथील  लोकवर्गणीतून सुमारे सात हजार रुपये, गृहउपयोगी वस्तू, कपडे अशा स्वरूपाची मदत करत माणुसकीचे वेगळे दर्शन घडवून अाणले अाहे

सविस्तर माहिती अशी की, मुरकुटे हे अतिशय गरीब कुटुंब असून अनेक वर्षांपासून येथे राहत अाहे. मोलमजुरी करूनच त्यांचा उदरनिर्वाह चालू अाहे. गुरुवारी दुपारी लागलेल्या अचानक अागीत संपुर्ण घराला आग लागली. त्या वेळी तेथील  सुप्रिया मुरकुटे यांनी आग लागल्याने आरडाओरडा केला. मात्र,  तो पर्यंत आगीणे रौद्ररुप धारण केले होते. अागीच्या ज्वालांचे प्रमाण जास्त असल्याने संपूर्ण घरच अागीच्या भक्षस्थांनी सापडले. या अागीत घरातील सर्व वस्तू, कागदपत्रे, कपडे जळून खाक झाले अन् संपूर्ण कुटुंबच उघड्यावर आले. तसेच एक शेळीही मरण पावली.

हि वस्तुस्थिती लक्षात घेत या कुटुंबाला पुन्हा नवी उभारी देण्यासाठी गावातील ग्रामस्थांनी एकत्र येत आर्थिक तसेच काही वस्तुरुपांनी मदत देऊ केली अाहे. या वेळी सरपंच पुष्पा जगताप, उपसरपंच रुषीकेश थिटे व ग्रामस्थ उपस्थित होते. या ग्रामस्थांनी  शासनावर विसंबून न राहता दिलेल्या  मदतीने समाजाला नवा अादर्श घालुन दिला अाहे.
Comment Box is loading comments...

Comment Box is loading comments...

संबंधित बातम्या