शासनाच्या योजनांचा बेरोजगारांनी लाभ घ्यावा- कदम

शिरूर, ता. २४ फेब्रुवारी २०१६ (मुकुंद ढोबळे): शासनाच्या जिल्हापरिषद, पंचायत समिती यांच्या माध्यमांतून अनुसूचित जाती, जमाती वर्गासाठी स्वयंरोजगार उपलब्ध व्हावा यासाठी अनेक योजना असून त्यांचा नागरिकांनी लाभ घ्यावा, असे आवाहन शिरूर पंचायत समिति सभापती सिद्धार्थ कदम यांनी व्यक्त केले.

जिल्हापरिषद व शिरूर पंचायत समिती समाज कल्याण विभागचे वतीने शिरूर तालुक्यातील बेरोजगार यांना रोजगार उपलब्ध व्हावा यासाठी दुकान, स्टॉल्स् व झेरॉक्स मशीन वाटप कार्यक्रमात श्री. कदम बोलत होते.

यावेळी पंचायत समिती उपसभापती मंगल लंघे, पंचायत समिती सहाय्यक गटविकास अधिकारी अशोक बांगर, कक्ष अधिकारी राजेश खंदारे, समाजकल्याण विभागचे लिपीक डी.पी.धोत्रे, घोलप व विविध गावाचे लाभार्थी उपस्थित होते.

यावेळी बोलताना सहाय्यक गटविकास अधिकारी अशोक बांगर म्हणाले,  'शासनाच्या समाज कल्याण विभागचे वतीने अनेक शंभर टक्के अनुदानांच्या योजना सुरू असून, याबाबत नागरिकांनी माहिती करून घ्यावा.'

शिरूर तालुक्यातील अनुसूचित जाती, जमाती, व्हीजेएनटी या वर्गातील ज्यांची उत्पन्न पन्नास हजार रुपयांच्या आत आहे अशा अकरा लाभर्थ्यांना लोखंडी स्टॉल्स् व सोळा जणांना कॅनन कंपनीचे झेरॉक्स मशीन वाटप करण्यात आले.

Comment Box is loading comments...

Comment Box is loading comments...

संबंधित बातम्या