...अन 'अर्चना'ला मिळाला मदतीचा हात !

कवठे यमाई, ता.२४ फेब्रुवारी २०१६ (सुभाष शेटे) :येथील 'अर्चना'ला शिक्षणासाठी हवाय तुमच्या मदतीचा हात" अशा मथळ्याखाली बातमी संकेतस्लथळावर प्रसिद्ध झाल्यानंतर या बातमीची विविध स्तरातुन मोठी दखल घेत अर्चना ला अनेकांनी  मदतीसाठी हात पुढे केला अाहे.अर्चना व तिच्या आजीस काहींनी आर्थिक मदत तर तिच्या वस्तीतील इतरही ८ शालेय विद्यर्थ्यांना कारेगाव एम आय डी सी तील अथर्व उद्योग समूहाच्या वतीने पक्की घरे,४ शौचालये व पाण्याची टाकी मिळणार आहे.तसेच गरीबीची जाण असणारे अथर्व उद्योग समुहाचे अध्यक्ष सतीश अंकुशराव पाचंगे व त्यांच्या पत्नी पंचायत समिती सदस्या मानिषाताई सतिश पाचंगे यांनी अर्चना हीस दत्तक घेत तिचा सर्व शैक्षनिक खर्च व घर बांधून देण्याचे  ठरवत सामजिक दातृत्वाचे सुंदर उदाहरण समाजापुढे ठेवले आहे.
 
आमचे संकेतस्थळ www.shirurtaluka.com वर अर्चना विषयी मदतीची  बातमी प्रसिद्ध झाल्यानंतर कारेगाव एम आय डी सी तील अथर्व उद्योग समूहाच्या वतीने सतीश पाचंगे यांनी आपल्या वाढदिवसाचा खर्च टाळून या चिमुरडीला दत्तक घेतले अाहे . किराणा  घेण्याकामी त्यांच्या पत्नी व शिरूर पंचायत समिती सदस्या मानिषा सतिश पाचंगे यांनी अर्चना जाधव हीस तातडीची मदत म्हणून ३,०००/- हजार रुपये मुख्याध्यापिका माया आव्हाड यांचेकडे दिले. तर अर्चनाचे शिक्षण व घरखर्चासाठी दरमहा तीन हजार रुपये व त्यांना घर बांधून देत ते या कुटुमबाला मदत करणार आहेत.याच बरोबर बातमीची दखल घेत आदिवासी विकास मंत्रालयातील सहसचिव प्रभाकर गावडे यांनी ही त्यांच्या विभागामार्फत ५०,०००/- हजार रुपयांची तातडीची मदत करणार असल्याचे सांगितले आहे. तसेच अनिल जाधव यांनी देखील अर्चनास २,०००/- रुपयांची मदत दिली आहे. तर गरीबीची जान असलेले व रंगकाम करुन हातावर पोट भरणारे येथील युवक सचिन माकर,संपत थोरात,सुनिल गोसावी,संतोष ढोबळे यांनी देखील गरीब अर्चनास दोन हजार रुपयांच्या मदतीचा हात दिलाय.इतर ही छोटी-मोठी आर्थिक मदत या आजी नातीला मिळण्याकामी समाजातील हात  अजुनही पुढे येत आहेत. 

एकंदरीत अत्यंत हलाखीचे व संघर्षमय जिवन जगण्यासाठी लढा देत असलेल्या आदिवासी ठाकर समाजातील अर्चना जाधव तिची आजी उमाबाई यांच्या परीस्थितीची मन हेलावणारी आमच्या संकेतस्थळावरील  बातमी वाचुन अनेकांची मने हेलावली असुन मदतीचा ओघ सूरु झाल्याने आज ही माणुसकी जिवंत असल्याचा प्रत्यय येतो असे या कुटुंबाने सांगितले अाहे.

*'अर्चना'ला शिक्षणासाठी हवाय तुमच्या मदतीचा हात!
Comment Box is loading comments...

Comment Box is loading comments...

संबंधित बातम्या