न्हावरेत पाणी वाटपात गोंधळ; कुणी पाणी देता का पाणी?

न्हावरा, ता. २४ फेब्रुवारी २०१६ (सतीश केदारी) : चासकमान कालव्याचे सुरु असलेले अावर्तन शिरसगांवला न पुरेसे न मिळताच बंद करण्यात अाले अाहे. शिवाय, न्हावरे येथे ही पाणी वाटपात गोंधळ होत असल्याचा आरोप न्हावरेच्या ग्रा.पं सदस्या अॅड.वैशाली बहिरट व सचिन बहिरट यांनी केला असून शिरसगावकरांवर मात्र 'कुणी पाणी देता का पाणी' असे म्हणण्याची वेळ अाली अाहे.

चासकमान धरणातून कालव्याला गेल्या अनेक दिवसांपासून अावर्तन सुरु अाहे. शिरसगावला दुष्काळाची तिव्रता मोठ्या प्रमाणावर जाणवत असून, गावासह कालव्यावर अवलंबून असलेल्या अनेक कालव्यानजिकच्या शेतक-यांना पिण्याची समस्या मोठ्या प्रमाणावर भेडसावत आहे. "कालवा उशाला पण कोरड घशाला अशी परिस्थिती निर्माण झाली अाहे. फेब्रुवारी महिन्यातच चारा देखील संपुष्टात अाला आहे. जनावरांना काय खायला घालायचे, असा सवाल परिसरातील शेतकरी करु लागले अाहेत. शिरसगाव ग्रामपंचायतने टॅंकर साठी प्रस्ताव पाठवला असून जिल्हाधिका-यांशी पाण्यासंदर्भात पाठपुरावा केला अाहे.

चासकमान कालव्याला पाणी सोडण्यात अाले. परंतु्, एक रात्र देखील पाणी न अाल्याने शिरसगावकरांची मात्र घोर निराशा झाली अाहे. वडगाव रासाई, कोळगाव तलाव देखील न भरताच पाणी बंद करण्यात आल्याने परिसरातील शेतक-यांमधून संतप्त प्रतिक्रिया उमटत अाहेत. पाणी वाटपात देखील कुठेतरी पाणी मुरत असून यातही राजकारण होत असल्याची संतप्त भावना येथील ग्रामस्थांच्या बोलण्यातून व्यक्त होत अाहे.

न्हावरे येथे एका चारीला सुरु असलेले पाणी अचानक कसे काय बंद केले जाते? की यात देखील अधिका-यांचे हात अोले करावे लागतात? असा खडा सवाल न्हावरेचे सचिन बहिरट यांनी व्यक्त केला अाहे.

दुष्काळ व पाण्याची गंभीर समस्येबाबत अामदार बाबुराव पाचर्णे यांच्याशी संपर्क साधला असता ते म्हणाले, 'शिरसगावला पाणी येTन गेले अाहे. अाता थेट पुढील वर्षीच पाणी येईल. घोड कालव्याच्या पाण्यासाठी मात्र प्रयत्न करणार आहे.'

या भागातील सत्ताधारी व विरोधक मात्र गप्पच असून पाणी वाटपात मोठा सावळा गोंधळ होत असल्याची या परिसरातील नागरिकांमध्ये चर्चा अाहे. याच भागातील जनता पाण्यासाठी टाहो फोटत असून 'कुणी पाणी देता का पाणी...' असे म्हणण्याची वेळ अाता या जनतेवर  अाली अाहे.
Comment Box is loading comments...

Comment Box is loading comments...

संबंधित बातम्या