'सरांच्या' अात्महत्येप्रकरणी तरुणाई उतरली रस्त्यावर

शिरूर, ता.२५ फेब्रुवारी २०१६ (मुकुंद ढोबळे/सतीश केदारी) : येथील विद्याधाम प्रशालेचे शिक्षक विलास करंजुले यांच्या अात्महत्येप्रकरणी संबंधितांवर कारवाई व्हावी, यासाठी अाज (गुरुवार) अाजी-माजी विद्यार्थ्यांसह समस्त तरुणाई रस्त्यावर उतरली होती.

या संबंधी अधिक माहिती अशी, विद्याधाम प्रशालेमध्ये गेल्या अनेक वर्षांपासून अध्यापन करत असलेले करंजुले यांनी मंगळवारी गळफास लावून जिवनयात्रा संपविली. यानंतर नातेवाईकांच्या अाक्रमक पावित्र्यानंतर सुपा (ता. पारनेर) येथील पोलीस स्टेशनला संस्थेच्या पदाधिका-यांसह काही व्यक्तींवर अात्महत्येसाठी प्रव्रुत्त केल्याप्रकरणी गुन्हे दाखल झाले अाहेत.

ज्यांच्यावर गुन्हेदाखल झालेत त्यांना ताबडतोब अटक करण्यात यावी, या मागणीसाठी अाजी-मााजी विद्यार्थ्यांनी  निषेध मोर्चाचे अायोजन केले होते. या मोर्चात तरुणाई चा मोठ्या प्रमाणावर लक्षणीय सहभाग होता. यावेळी  जमलेल्या विद्यार्थ्यांनी घोषणा देऊन गुन्हेगारांना अटक झालीच पाहिजे, या  मागणीसाठी पोलिस निरीक्षक भागवान निंबाळकर यांच्याकडे मागण्यांचे निवेदन  दिले अाहे.
Comment Box is loading comments...

Comment Box is loading comments...

संबंधित बातम्या