शिरुरमध्ये क्वालिटी ड्रायक्लीनर दुकानाला आग;लाखोंचे नुकसान

शिरूर, ता. २७ फेब्रुवारी २०१६ (मुकुंद ढोबळे) : शिरूर नगरपरिषद व्यापारी संकुलात असणाऱ्या क्वालिटी ड्रायक्लीनर या  दूकानाला आग लागून लाखो रूपयांचे नुकसान झाल्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे.ही आगीची घटना काल रात्री अकरानंतर लागली आहे.

संतोष शितोळे यांच्या मालकीचे असणारे क्वालिटी ड्रायक्लिनर हे दुकान रात्री बंद करून गेल्यानंतर रात्री अकराच्या दरम्यान तेथे काही तरुणांना या बेसमेन्ट मधील या दूकानाच्या शटर मधून धूर येत असल्याचे दिसल्यानंतर तेथील सुरक्षा रक्षक याला ही बाब सांगितली त्याने दूकानाचा कामगार यास बोलावून घेऊन दूकानाचे शटर उघडून पाहिले असता आग छोटी होती ती विझवण्याचा प्रयत्न केला परंतु दुकानात असणारे कपड्यांना आग लागताच तिने रौद्ररूप धारण केले. काही वेळाने खाजगी पाण्याच्या टॅंकर च्या साह्याने आग आटोक्यात  अाणण्यात आली.या दुकानात ड्रायक्लिनिंग साठी आलेल्या साड्या ,पुरुषांची  कपडे या आगीत  पुर्णपणे जळून खाक झाले आहेत.यात एकूण लाखो रूपयाचे नुकसान झाल्याचा अंदाज व्यक्त केला जातोय. या  अागीचे नेमके कारण समजु शकले नाही.

या वेळी तरुणांनी दाखविलेल्या प्रसंगावधानाचे मोठे कौतुक करावे लागेल.
Comment Box is loading comments...

Comment Box is loading comments...

संबंधित बातम्या