उसाच्या ट्रॅक्टर ने कारला अपघात; २ गंभीर जखमी

शिरूर, ता. २७ फेब्रुवारी २०१६ (मुकुंद ढोबळे) : पुणे-नगर महामार्गावर न्हावराफाटा येथे रस्ता क्रॉस करणाऱ्या स्विप्ट डिझायर कारला उसाच्या ट्रक्टरची धडक बसली. उसाने भरलेला ट्रॅॅक्टर कारवर पलटी होऊन झालेल्या अपघातात कार मधील दोघे गंभीर जखमी झाले आहेत.

या अपघातात समाधान साबळे (वय 35, रा. करंजुले वस्ती, शिरूर), राजेंद्र  उपाध्याय (वय 45,  रा . पुणे ) हे दोघे या अपघातात गंभीर जखमी झाले आहे .

याबाबत शिरूर पोलिसांनी दिलेली माहितीनुसार, काल दुपारी न्हावरा फाटा येथील माणिकचंद कंपनीतील कामगार साबळे व अॉडिटर उपाध्याय हे दोघे काम उरकून जेवणासाठी स्विप्ट डिझायर कार क्रमांक MH-12 ML-3618 ने निघाले होते. काही अंतरावरुन यू टर्न घेत असतांना उसाने भरलेला ट्रॅक्टरने कारला मागून धडक दिली. उसाने भरलेली एक ट्रॅालि कारवर पूर्णपणे उलटी झाली. यामध्ये कार पूर्णपणे ट्रॅॅक्टर खाली दबली गेल्याने अातील दोघे कार मध्येच अडकले. कारमध्ये अडकलेले  समाधान यांनी कसे तरी खिशातिल मोबाईल काढला व कंपनीत मित्राला फोन करून आमचा अपघात झाला असल्याचे सांगितले. त्यानंतर जवळच असलेले कंपनीतील कामगारांनी अपघात स्थळी धाव घेउन कार वरील उस व ट्रॅॅक्टर बाजूला केला. त्यानंतर कार मधील दोघांना ट्रॅक्टरच्या साह्याने कारचा पत्रा बाजूला करून बाहेर काढले. यांत साबळे याच्या हाताला तर उपाध्याय यांच्या डोके व मानेला मार लागला असून साबळे यांच्यावर शिरूर येथील  धारिवाल तर उपाध्याय यांना पुणे येथील खाजगी हॉस्पिटल येथे उपचारांसाठी दाखल करण्यात अाले आहे. या पुढील तपास शिरूर पोलिस करीत आहे .

देव तारी त्याला कोण मारी

न्हावरेफाटा  येथे झालेल्या अपघातात स्विप्ट कारला ट्रॅॅक्टर च्या अपघातात ऊसाने भरलेला ट्रॅॅक्टर पूर्णपणे कारवर ऊसासह पलटी झाल्यानंतर पाउन तास त्यामधे समाधान साबळे व राजेंद्र उपाध्याय अडकले होते.त्यानंतर त्यांना बाहेर काढले असून दोघांची परिस्थिती ठीक असल्याचे समजते. यावेळी अाश्चर्यकारकरित्या दोघेही बचावल्याने देव तारी त्याला कोण मारी याचा प्रत्यय अाला.
Comment Box is loading comments...

Comment Box is loading comments...

संबंधित बातम्या