शिरसगावमध्ये व्हॉट्सऍप ग्रुपवर चर्चा; गुन्हा नोंदविण्याची मागणी

शिरसगाव काटा, ता.२७ फेब्रुवारी २०१६ (तेजस फडके)- येथील ग्रुपवर  सरपंच, उपसरपंच व ग्रामपंचायतीविषयी बदनामीकारक मजकूर प्रसारित केल्याप्रकरणी गुन्हा नोंदविण्यात यावा, अशी मागणी येथील ग्रामपंचायत ने लेखी निवेदनावर शिरुर पोलीस  स्टेशनला केली अाहे.

याबाबतसविस्तर मााहिती अशी की, या गावातील तरुणांचा व्हॉट्सऍपवर 'शिवसाम्राज्य नावाचा ग्रुप आहे. या ग्रुपवर कुणाल गद्रे व वैभव दादा कोळपे हे चॅटिंग करत होते. वैभव हा जि. प. सदस्य दादा कोळपे यांचा मुलगा असून ग्रुपवर चॅटिंग करताना वैभवने सरपंच, उपसरपंच यांच्याविषयी अाक्षेपार्ह मजकुर प्रसारीत केला. सदर ग्रुपमध्ये शिरसगाव व पिंपळसुटी येथील सदस्य काही याविषयी गावात चर्चा करत अाहेत. त्यामुळे वैभव दादा कोळपे याच्यावर सायबर गुन्ह्याखाली कारवाई करण्यात यावी, अशी मागणी ग्रामपंचायत ने लेखी पत्राद्वारे केली अाहे.

या संदर्भात वैभव कोळपे यांच्याशी संपर्क साधला असता ते म्हणाले, 'मी एक नागरिक म्हणून  माझी प्रतिक्रिया व्यक्त केली अाहे. मी सज्ञान अाहे. जे बोललो ते खरे अाहे.'
Comment Box is loading comments...

Comment Box is loading comments...

संबंधित बातम्या