पाबळ दरोडाप्रकरणातील आरोपींवर मोक्का- राजेंद्र मोरे

पाबळ, ता. २८ फेब्रुवारी २०१६ (विशेष प्रतिनीधी): येथील दरोड्याप्रकरणी अटक करण्यात अालेल्या चारही आरोपींवर आता मोक्का कायद्यांतर्गत कारवाई करण्यात आली आहे, अशी माहिती दौंडचे उपविभागीय अधिकारी राजेंद्र मोरे  यांनी दिली अाहे.

१७ डिसेंबर २०१५ रोजी पहाटे पाबळ येथील फुटाणवाडी व फणसे मळा या दोन ठिकाणी आरोपींनी बगाटे व पिंगळे कुटुंबांवर सशस्त्र दरोडा टाकला होता. त्यांनी केलेल्या मारहाणीत रखमाबाई बगाटे व दिनेश पिंगळे या दोघांचा मृत्यू झाला होता. या गुन्ह्याचा तपास स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेकडे सोपविण्यात आला होता.
 
या प्रकरणी चंग्या ऊर्फ संदेश रामलाल ऊर्फ रमेश काळे (वय २३, रा. कोळगाव, ता. श्रीगोंदा) व शरद ऊर्फ शेर्‍या आप्पासाहेब काळे (वय २१, रा. रांजणगाव मस्जीद, ता. पारनेर), प्रवीण ऊर्फ फल्या आकार्शा काळे (वय २५) व श्रीक्रुष्ण ऊर्फ लंगड्या आकार्शा काळे (वय २0, दोघेही राहणार रा. रांजणगाव मशीद, घाडगेवाडी, ता. पारनेर, जि. नगर) अशी  कारवाई करण्यात अालेल्या आरोपींची नावे आहेत.

या विषयी उपविभागीय पोलीस  अधिकारी राजेंद्र मोरे यांनी सांगितले, 'यातील मुख्य आरोपी चंग्या ऊर्फ संदेश काळे याच्यावर पंधरा गंभीर गुन्ह्यांची नोंद आहे. यात दोन गुन्ह्यांमध्ये त्याला शिक्षा झाली आहे. खून, दरोडे असे गंभीर गुन्हे आरोपींवर आहेत. अहमदनगर, बेलवंडी, सुपा, शिक्रापूर, कोतवाली एमआयडीसी आदी परिसरात आरोपींनी गंभीर गुन्हे केले आहेत.'

या गंभीर गुन्ह्यांमुळे विशेष पोलिस महानिरीक्षक कोल्हापूर परिक्षेत्र यांनी आरोपींवर मोक्का कायद्यांतर्गत कारवाई करण्यास परवानगी दिली.
Comment Box is loading comments...

Comment Box is loading comments...

संबंधित बातम्या