विद्यार्थ्यांनी अात्मविश्वासाने परिक्षेला सामोरे जावे- दीपाली शेळके

सविंदणे, ता.१ मार्च २०१६ (प्रतिनीधी) : विद्यार्थ्यांनी अात्मविश्वासाने परिक्षेला सामोरे गेल्यास अपेक्षित यश नक्किच साधता येईल, असे मत पं.स सदस्या व यशस्विनीच्या तालुका समन्वयक दीपाली शेळके यांनी या वेळी बोलताना व्यक्त  केले.

सविंदणे येथील दत्त विद्यालयात संपन्न झालेल्या दहावीच्या विद्यार्थ्याचा निरोप समारंभ व ई लर्निंगच्या उदघाटन समारंभात त्या प्रमुख पाहुण्या म्हणून बोलत होत्या. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मुख्याध्यापक टी .एल पाचर्णे हे होते.

या विद्यालयास रोटरी क्लब शिक्रापूर यांच्यावतीने दोन ई लर्निंग संच नुकतेच भेट म्हणुन देण्यात अाले. दहावीच्या विद्यार्थ्यांच्या निरोप समारंभ प्रसंगी शिरूर पंचायत समिती सदस्या दिपाली शेळके यांच्या हस्ते उद्घाटन समारंभ पार पडला.

या कार्यक्रमाला डॉ. मच्छिंद्र गायकवाड, प्रा मांढरे, सचिन खेडकर, रमेश वाळके, पत्रकार राजाराम गायकवाड, शेरखान शेख, पोपट शिंदे, फकीरा लंघे, बाळासाहेब नाथु लंघे, प्रगतीशील शेतकरी बाळासाहेब पडवळ उपस्थित होते.
 
शेळके म्हणाल्या, 'ई-लर्निंगच्या माध्यमाचा  विद्यार्थ्यांनी जास्तीत जास्त उपयोग करुन अभ्यास करावा व आपल्या ज्ञानात भर घालावी. विद्यार्थ्यानी  सतत  प्रयत्नशील राहिले पाहिजे. आपले आई वडील व गुरुजनासह शाळेला कधी ही विसरता कामा नये. त्यांच्या ऋनातुन आपण कधीच उतराई होऊ शकत नाही.' या वेळी रोटरी क्लब शिक्रापूर यांच्या माध्यमातून करण्यात येत असलेल्या विधायक कामांची माहिती डॉ. मच्छिंद्र  गायकवाड यांनी उपस्थितांना दिली.

या वेळी  उपस्थित मान्यवरांनी १०वी च्या विद्यार्थ्याना शुभेच्छा दिल्या. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन गोफणे यांनी तर आभार निलम दंडवते यांनी मानले.
Comment Box is loading comments...

Comment Box is loading comments...

संबंधित बातम्या