मलठणच्या मंडल अधिकाऱ्यावर लाचप्रकरणी गुन्हा दाखल

शिरूर, ता. 1 मार्च 2016- वारस नोंदीच्या प्रकरणात बाजूने निकाल देण्यासाठी आठ हजार रुपयांची मागणी केल्याप्रकरणी मलठण येथील मंडल अधिकाऱ्याविरोधात शिरूर पोलिस ठाण्यात लाच मागितल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

शशिकांत तमन्ना सनदी असे गुन्हा दाखल झालेल्या मंडल अधिकाऱ्याचे नाव आहे. तक्रार यांच्या सातबारा उताऱ्यावर वारसदारांची नोंद करावयाची होती. परंतु, त्याबाबत आक्षेप आल्याने हे प्रकरण सनदी याच्याकडे सुनावणीसाठी आले होते. या प्रकरणात बाजूने निकाल देण्यासाठी त्याने तक्रारदारांकडे आठ हजार रुपयांची मागणी केली. याबाबत त्यांनी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार केली होती. त्यानुसार तक्रारीची खातरजमा करून सनदीविरोधात शिरूर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

या संदर्भात सुदाम बबन गोरडे (रा. वाघाळे) यांनी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार केली होती. गोरडे यांच्याकडे सनदी यांनी वारस नोंदीसाठी आठ हजार रुपयांची मागणी केली होती. त्यामुळे गोरडे यांनी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार करुन कारवाईची मागणी केली. या मागणीची दखल घेत लाचलुचपत विभागाने सोमवारी दुपारी सापळा रचून ताब्यात ताब्यात घेतले.

दरम्यान, शिरूर तालुक्यातील विविध भागांमधील सर्वसामान्य नागरिकांना महसूल विभागाचे अधिकारी वेठीस धरत आहेत. कागदपत्रांची पूर्तता केल्यानंतरही जाणून-बूजून ते काम टाळत आहेत. दूरध्वनी न घेणे, भेटीची वेळ न देणे. भेटीची वेळ दिली तर ताटकळत ठेवणे. वरिष्ठांचेही आदेन न मानणे व कामाची पूर्तता करण्यासाठी पैशांची मागणी केली जाणे, अशा तक्रारी नागरिक करत आहेत.
Comment Box is loading comments...

Comment Box is loading comments...

संबंधित बातम्या