काय करावं साहेब तुम्हीचं सांगा अाता?

शिंदोडी, ता. ५ मार्च  २०१६ (तेजस फडके) : कारखान्याने  उसाच बिल नाय  दिले, सोसायट्या बॅंकांची देणी थकलीय, डोक्यावर  कर्जाचा डोंगर वाढतोय, उसनवारीने घेतलेले पैसे द्यायचेत, पोरींची लग्न करायची हायेत. काय करावं साहेब तुम्हीचं सांगा अाता? हा संतप्त सवाल अाहे येथील शेतक-यांचा !

या संदर्भात गावातील धावडे व फडके या शेतक-यांशी संवाद साधला असता  सांगितले की, "मुलींची लग्न ठरली असुन साईकृपा कारखान्याने गेले वर्षभरात एकही रुपया न दिल्याने लग्नाच्या तारखा वारंवार पुढे ढकलाव्या लागत असुन लग्नासाठी पैसे कोठुन उभे करायचे? प्रपंच चालवणे मोठे जिकिरीचे झाले अाहे" असे त्यांनी भावनाविवश होत www.shiruretaluka.com  शी बोलताना सांगितले.

साईकृपा यूनिट २ या  साखर कारखान्याने सन २०१४-१५ च्या ऊस गाळपाचे पैसे न दिल्याने येथील शेतकरी मोठा संकटात सापडला अाहे. अनेकांची बिकट परिस्थिती झाली असtन बॅंका, सोसायट्या, खासगी सावकारी चा पाश येथील शेतक-यांच्या गळ्याला अाल्याने येथील ग्रामस्थांनी गुरुवारपासून (ता. ३)गावातील मंदिरात उस गाळपाचे पैसे मिळावेत यासाठी धरणे आंदोलन सुरु केले अाहे.

या अांदोलनाची तीव्रता वाढली असून शिवसेनेच्या पदाधिका-यांनी व संतप्त शेतकऱ्यांनी अाज  बबनराव पाचपुते यांच्या प्रतिकात्मक पुतळ्याचे दहन करत निषेध व्यक्त केला. यावेळी  शिवसेनेचे जिल्हाप्रमुख व तालुक्यातील पदाधिका-यांनी भेट देऊन पाठिंबा व्यक्त केला.

राम गावडे म्हणाले की, 'शिवसेना सत्तेत सहभागी असली तरीही शेतकऱ्यांना आमचा पुर्ण पाठिंबा असुन शेतकऱ्यांना त्यांचे घामाचे पैसे जोपर्यंत मिळत नाही तोपर्यंत शिवसेना स्वस्थ बसणार नाही.याबाबत आम्ही मुख्यमंत्री व सहकारमंत्री यांच्याकडे पाठपुरावा करुन शेतकऱ्यांना न्याय मिळवून देऊ अशी ग्वाही त्यांनी दिली.'

अनिल काशिद बोलताना म्हणाले की, 'बबनराव पाचपुते हे गळ्यात माळ घालून प्रवचन करतात पण त्यांची अवस्था "गळ्यात माळ अन पोटात काळ " अशी असुन गेले वर्षभर शेतकऱ्यांचे हक्काचे पैसे देण्यास ते टाळाटाळ करत आहेत.'

यावेळी शिवसेनेचे राम गावडे, अनिल काशिद, अनिल पवार, संतोष काळे, आनंदा ढोरजकर, योगेश ओव्हाळ,  नानाभाऊ फडके,ज्ञानदेव वाळुंज, बाळासो धावडे, पांडुरंग फडके, संतोष टाकळकर, राजेंद्र खेडकर यांच्यासह ग्रामस्थ मोठया प्रमाणात उपस्थित होते.

Comment Box is loading comments...

संबंधित बातम्या