'सरां'च्या अात्मह्त्या प्रकरणातील अारोपी अद्याप फरारीच

शिरूर, ता.६ मार्च २०१६ (सतीश केदारी): विद्याधाम प्रशालाचे शिक्षक विलास करंजुले यांच्या अात्महत्येनंतर अद्यापही या प्रकरणातील प्रतिष्ठित अारोपी फरार असल्याचेच पोलिसांकडून सांगण्यात येत अाहे.

या संदर्भात सविस्तर माहीती अशी की, विलास मेसू करंजुले हे शिरुर येथील विद्याधाम प्रशाला येथे शिक्षक म्हणुन कार्यरत होते. संस्थाचालकांच्या छळास कंटाळुन त्यांनी पाडळी रांजणगाव (ता.पारनेर) येथे राहत्या घरी गळफास घेऊन अापली जिवनयात्रा संपविली होती. याप्रकरणी त्यांच्या पत्नी मंगल करंजूले यांच्या फिर्यादीवरुन सुपा पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात अाला होता. त्यानंतर हा गुन्हा शिरुर पोलीस स्टेशनला वर्ग करण्यात अाला अाहे.

या अात्महत्या प्रकरणातील अारोपी शिरुर शिक्षण संस्थेचे अध्यक्ष सुकुमार बोरा, सचिव, तुळशीराम परदेशी, सदस्य चंद्रकांत बाफना, मुख्याध्यापक सुभाष वेताळ, सहशिक्षक पांडुरंग वेताळ यांच्यासहित तीन अनोळखी  व्यक्ती अशा एकूण अाठ जणांच्याविेरोधात गुन्हा दाखल करण्यात अाला अाहे.

करंजूले सरांच्या अात्महत्या प्रकरणानंतर अाजी मााजी विद्यार्थ्यांनी रस्त्यावर येत अांदोलन करत निषेध व्यक्त केला अाहे. याप्रकरणी सोशल मिडियावर देखील मोठ्या प्रमाणात प्रतिक्रिया उमटल्या असून एक विद्यार्थ्यांची  भावनिक साद असलेली पोस्ट वाचायला मिळते अाहे. ती पुढीलप्रमाणे- 'गेल्या तीस वर्षांपासून अविरत प्रामाणिकपणे शिक्षणक्षेत्रात योगदान दिल्यानंतर  बढतीचा काळ समोर अाल्यानंतर त्यांच्यावर अारोपांचे शिंतोडे उडविण्यात अाले. तर या प्रकरणात अारोप-प्रत्यारोप देखील करण्यात अाले. करंजुले सरांनी शेवटी त्यांच्या गावी रांजणगाव पाडळी ला अात्महत्या केली.'
 
या घटनेनंतर अाजी-माजी विद्यार्थ्यांनी  अांदोलन करुन अारोपींवर कारवाई व्हावी ही मागणी केली  होती. या प्रकरणातील प्रतिष्ठित असलेले अारोपी फरार असल्याचे व पोलिस मागावर असल्याचे पोलिसांकडून सांगितले जात अाहे.
Comment Box is loading comments...

Comment Box is loading comments...

संबंधित बातम्या