घोड कालव्याला पाणी सोडले; ग्रामस्थांकडून जलपूजन

शिरसगाव काटा, ता. ६ मार्च २०१६ (सतीश केदारी) : घोड  उजव्या कालव्याला पिण्यासाठी पाणी सोडल्यानंतर अाज येथील ग्रामस्थांनी स्वागत करत जलपुजन केले. या अावर्तनाने पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सुटणार असल्याने ग्रामस्थांनी समाधान व्यक्त केले.

रविवारी सकाळी सातच्या सुमारास पाणी सोडल्यानंतर दुपारी शिरसगाव हद्दीत पाणी पोहोचताच पोलिस कर्मचारी, घोड पाटंबंधारेचे वरीष्ठ अधिका-यांच्या उपस्थितीत ग्रामस्थांनी जलपूजन करुन पाण्याचे मोठ्या उत्साहात स्वागत केले. या प्रसंगी वेळी राजेंद्र लोंढे, रामचंद्र केदारी, लक्ष्मण जगताप, ग्रामस्थ व महिला मोठ्या प्रमाणावर उपस्थित होत्या.

शिरुर तालुक्याचा पु्र्व भाग समजल्या जाणा-या लाभक्षेत्रात पाणी टंचाई मोठ्या प्रमाणावर जाणवत होती. पिण्याच्या पाण्यासह जनावरांचे देखील हाल होते. शिरसगावला टॅंकर सुरु करण्यासंबंधी ग्रामपंचायतने मागणी देखील केली होती. शरद गद्रे यांनी देखील लेखी निवेदन जिल्हाधिका-यांसह सर्व विभागांना दिले होते.

पाणी वाटपाबाबत मंगळवारी उशीरा श्री. राव यांनी याबाबत घोड धरणातून उजव्या कालव्याला ५५ दशलक्ष घनफुट पाणी सोडण्याचा अादेश दिला होता. त्यानुसार घोड कालव्यातील काटेरी झुडुपे, कचरा इ. साफसफाई ची कामे गेल्या दोन दिवस सुरु होती. त्यानंतर अाज सकाळी उजव्या कालव्याला घोड धरणातून पाणी सोडण्यात अाले अाहे.

या सोडलेल्या अावर्तनाचा लाभ शिरसगाव, पिंपळसुटी, इनामगाव, तांदळी, वडगाव रासाई या गावांना होणार असून बहुप्रतिक्षेनंतर पाणी अाल्याने शेतक-यांकडून समाधान व्यक्त केले जात अाहे.

यावेळी पाणी चोरी रोखण्यासाठी पोलीस कर्मचारी अशोक गारगोटे, श्री. खोमणे यांच्यासह  घोड कालव्याचे उपअभियंता कातोरे, परदेशी, सुपेकर, एन.डी.चिरके, मंडलाधिकारी एस. टी. शिवले, तलाठी रविंद्र सरोदे, शाखाधिकारी अांबेकर, भरड, कर्मचारी बाळासो जगताप यांचे एक पथक नजर  ठेवून असून पाणी चोरांवर कडक कारवाई करणार असल्याचे त्यांनी सांगितले.
Comment Box is loading comments...

Comment Box is loading comments...

संबंधित बातम्या