विवाहातील अनाठायी रक्कम दुष्काळग्रस्तांसाठी!

रांजणगाव गणपती, ता. 8 मार्च 2016 (पोपट पाचंगे)- विवाह समारंभातील डामडौल व अनाठायी खर्चाला फाटा देत ती रक्कम दुष्काळग्रस्तांना मदत म्हणून देत कान्हू टाव्हरे यांनी समाजापुढे एक आदर्श निर्माण केला आहे. विवाह समारंभात वाचलेली रक्कम दुष्काळग्रस्तांना देण्यात शिरूर तालुका हा नेहमीच अग्रेसर असल्याचे दिसून आले आहे.

येथील सामाजिक कार्यकर्ते कान्हू टाव्हरे यांचे चिरजींव गोविंद आणि रावडेवाडी येथील स्व. माणिक येवले यांची कन्या अर्चना यांचा विवाह नुकताच पार पडला. यावेळी टाव्हरे परिवाराच्या वतीने सत्कार, फटाके व अनाठायी खर्चाला फाटा देत सुमारे 11 हजार रूपयांची रोख रक्कम दुष्काळग्रस्तांसाठी पञकार पोपटराव पाचंगे यांच्याकडे सुपूर्द केली. भीमाशंकर साखर कारखान्याचे संचालक ऍड. प्रदीप वळसे पाटील, विवेक वळसे पाटील, शिरूर बाजार समितीचे माजी सभापती प्रकाश पवार, संचालक राजेंद गावडे, जिल्हा राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे उपाध्यक्ष दशरथ फंड, कार्याध्यक्ष बाळासाहेब भोर, मल्हारी मलगुंडे, दिलीप लोखंडे, गणेश लांडे, अनिल दुंडे, गोरक डाळींबकर यांसह मान्यवर उपस्थित होते.

दरम्यान, या विधायक उपक्रमाचे सध्या सर्वञ कौतूक होत आहे.
Comment Box is loading comments...

Comment Box is loading comments...

संबंधित बातम्या