निमगाव म्हाळुंगी येथील अनुसया पवार यांचे निधन

निमगाव म्हाळुंगी, ता. ८ मार्च  २०१६ : येथील जुन्या पिढीतील अनुसया रामचंद्र पवार (वय ९५) यांचे अल्पशा अाजाराने मंगळवारी (ता. 8) निधन झाले. यांच्या मागे २ मुलगे, ४ मुली, सुना व नातवंडे असा परिवार अाहे.

निमगाव म्हाळुंगी येथील शिक्षक दादाभाऊ पवार व माजी सैनिक नारायण पवार यांच्या त्या मातोश्री होत. मंगळवारी रात्री उशिरा त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते.

अनुसया पवार यांनी मोठ्या कष्टातून संसार उभा करून मुलांना शिक्षण दिले होते. हालाखीच्या परिस्थितीत केलेली कामे व जुन्या आठवणी त्या नेहमी सांगत. परिसरामध्ये 'आई' या नावाने त्यांची ओळख होती.

दरम्यान, गुरुवार (ता. 17) रोजी गावामध्ये दशक्रियेचा विधी होणार आहे.

Comment Box is loading comments...

संबंधित बातम्या