अण्णापूरमध्ये वेटरने केला हॉटेल व्यवस्थापकाचा खून

आण्णापूर, ता. ९ मार्च २०१६ (प्रतिनीधी) : या गावच्या हद्दीत हॉटेल देवकीनंदन येथे हॉटेलचा दरवाजा उघडला नसल्याच्या रागातून हॉटेल व्यवस्थापकाचा वेटरने खून केल्याची घटना घडली आहे.
 
जयराज सुखविंदरसिंग सिसोदिया (वय ४० रा. भवाले जि.जळगाव) असे खून झालेल्या हॉटेल व्यवस्थापकाचे नाव आहे. शिरूर पोलिसांनी दिलेल्या माहिती नुसार, सोमवारी (ता. ७) रोजी रात्री ११ः५४ च्या सुमारास विशाल रमेश तिवारी व कुमार रामचंद्र निंबाळकर या दोघांनी हॉटेलचे व्यवस्थापक जयराज सिसोदीया यांना हॉटेलचा दरवाजा उघडला नाही व किचनचे लॉक का तोडले? असे विचारले. या गोष्टींचा राग धरून संशयित अारोपींनी त्यांना लोखंडी पट्टी, प्लॅस्टिक खुर्ची, लाकडी दांडके व लाथाबुक्क्यांनी मारहाण करून त्यांचा खून केला व पळून गेले.

या प्रकरणी रमेश पिराण्णा गवळी (अण्णापूर) यांनी शिरूर पोलिसांत फिर्याद दिली असून, पुढील तपास पोलिस निरीक्षक भगवान निंबाळकर करीत आहेत.
Comment Box is loading comments...

Comment Box is loading comments...

संबंधित बातम्या