अत्याधुनिक स्वर्गरथाचा लोकार्पण सोहळा शिरुरला संपन्न

शिरूर, ता. ९ मार्च २०१६ (मुकुंद ढोबळे / सतीश केदारी): शिरूर जैन समाज श्री जैन समाज स्पंदन प्रतिष्ठाण यांचे वतीने सर्व धर्मीय करिता स्वर्गरथ तयार करून या स्वर्गरथाचा लोकार्पण सोहळा आमदार बाबुराव पाचर्णे व सभागृह नेते प्रकाशभाऊ धारिवाल यांच्या हस्ते नुकताच संपन्न  झाला.
 
यावेळी शिरूरच्या नगराध्यक्षा मनीषा गावडे, नामदेव घावटे, संघपती शांतिलाल कोठारी, माजी नगरसेवक नेमीचंद फुलफगर, कांतीलाल बाफणा, पोलिस निरीक्षक भगवान निंबाळकर, नगरसेवक विजय दुगड, रविंद्र ढोबळे, जाकीर खान पठाण, संतोष भंडारी, दादाभाऊ वखारे, अशोक पवार, रमाकांत बोरा, प्रकाश धाडिवाल, उज्वला बरमेचा, गोकुल मूथा, राहुल बोथरा, संतोष पटवा, रविंद्र कर्नावट, भरत चोरडिया, वर्धमान रुणवाल, आनंद जोशी, विनोद धाडिवाल, दिपक ताथेड, प्रकाश बाफणा, चंद्रकांत बोरा-सुभाष शहा, अमित कोठारी, वर्धमान रुणवाल, बाळासाहेब कर्नावट, आब्बासभाई शिकलकर व नागरीक  मोठया प्रमाणात उपस्थित होते.

संस्कार मय पिढीव चांगले विचार तरुणांनी घेतले तर समाजासाठी ते चांगले काम करू शकतात त्याच विचारातून त्यांनी सर्व समाजातील गरीब असो वा श्रीमंत त्याचा शेवटचा दिवस गोड व्हावा त्यातून समाधान मिळावे या हेतूने स्वर्गरथ तयार केला. यात मोठे सामाजिक आदर्श आणि विचार असल्याचे सांगत आमदार पाचर्णे यांनी  श्री जैन समाज स्पंदन प्रतिष्ठाणच्या कार्यकर्त्याँचे कौतुक केले.

Comment Box is loading comments...

Comment Box is loading comments...

संबंधित बातम्या