अर्चना जाधवला आदिवासी विभागाकडून मदतीचा आदेश

कवठे यमाई, ता. 11 मार्च 2016 (सुभाष शेटे)- एका डोळ्यास अंधत्व तर दुसया डोळ्याची शस्त्रक्रिया झाली असताना व गरिबीशी झगडत शिक्षणाची ओढ असलेल्या येथील हिलाळ मळ्यातील जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळेत इयत्ता दुसरीच्या वर्गात शिक्षण घेत असलेल्या आदिवासी ठाकर समाजातील अर्चना संजय जाधव हीस आदिवासी विकास मंत्रालयातील उप सचिव प्रभाकर गावडे यांच्या माध्यमातून पन्नास हजार रुपयांची मदत मिळाली आहे.

गुरुवारी (ता. 10) एकात्मिक आदिवासी प्रकल्प घोडेगाव (ता. आंबेगाव) येथील प्रकल्प अधिकारी चेतना मोरे यांनी मदतीचा आदेश आमचे प्रतिनिधी सुभाष शेटे यांच्याकडे येथील कार्यालयात दिला. लवकरच ही रक्कम अर्चना जाधवच्या बॅंक खात्यात जमा होणार असल्याचे मोरे यांनी सांगितले. या वेळी हिलाळमळा प्राथमिक शाळेच्या शिक्षिका योगिता चाटे, शालेय समितीचे बाळासाहेब हिलाळ उपस्थित होते.

शिरूर तालुक्‍यातील कवठे येमाईच्या हिलाळमळा प्राथमिक शाळेतील दुसरीच्या वर्गात शिकणारी आदिवासी ठाकर समाजातील गरीब, हुशार व शिकण्याची उमेद असणा-या चिमुरड्या अर्चनाच्या परिस्थिती विषयीचे वृत्त संकेतस्थळाने दिले होते. शिवाय, वेळोवेळी या प्रश्‍नी पाठपुरावा केल्यानंतर या वृत्ताची थेट आदिवासी कार्य विकास मंत्रालयातून दखल घेतली गेली आहे. शिरूर तालुक्‍यातील मूळ टाकळी हाजी गावचे असणारे व सध्या आदिवासी कार्य विकास मंत्रालयात उपसचिव पदावर कार्यरत असणारे प्रभाकर गावडे यांनी या प्रश्‍नी त्यांच्या विभागाकडून अर्चना जाधवला मदत मिळण्याकामी महत्त्वपूर्ण भूमिका बजावली.

अर्चनास प्रभाकर गावडे यांच्या माध्यमातून ही भरीव मदत मिळाल्याने कवठे येमाई, हिलाळमळा ग्रामस्थांनी गावडे व आदिवासी कार्य विकास प्रकल्प घोडेगाव येथील प्रकल्प अधिकारी चेतना मोरे यांचे आभार मानले आहेत. आदिवासी समाजातील कुटुंबांना भेडसावणा-या विविध समस्या सोडविण्याकामी प्राधान्याने व सर्वतोपरी प्रयत्नशील असल्याचे आदिवासी विकास विभागाचे मंत्रालयातील उपसचिव प्रभाकर गावडे व घोडेगाव कार्यालय प्रकल्प अधिकारी चेतना मोरे यांनी सांगितले.
Comment Box is loading comments...

Comment Box is loading comments...

संबंधित बातम्या