कोंढापुरी सोसायटी बिनविरोध; उपाध्यक्षपदी प्रथमच महिला

कोंढापुरी, ता. 12 मार्च 2016- येथील विविध कार्यकारी सोसायटीच्या अध्यक्षपदी शांताराम गायकवाड यांची तर उपाध्यपदी फुलाबाई माधवराव गायकवाड यांची बिनविरोध निवड झाली. माजी सरपंच स्वप्निल गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली निवडणूक बिनविरोध झाली.

जागतिक महिला दिनाचे औचित साधून स्वप्निल गायकवाड यांनी सोसायटीमध्ये फुलाबाई गायकवाड यांना उपाध्यक्षपदी संधी दिली. सोसायटीच्या इतिहासात प्रथमच महिलेला उपाध्यक्षपदाचा मान मिळाला आहे. स्वप्निल गायकवाड यांनी केलेल्या प्रयत्नामुळे हे होऊ शकले.

शिरूर तालुक्यातील विविध गावांमध्ये सोसायटीच्या निवडणूकांसाठी मोठ्या प्रमाणात खर्च केला जात आहे. शिवाय, मंतानाही वेगवेगळा भाव फुटत आहे. यामुळे कोट्यावधी रुपयांचा चुराळा होत आहे. परंतु, येथील निवडणूक बिनविरोध करण्याबरोबरच एका महिलेला उपाध्यक्षपदाचा मान मिळवून दिल्याबद्दल स्वप्निल गायकवाड यांचे अभिनंदन होत आहे.
Comment Box is loading comments...

Comment Box is loading comments...

संबंधित बातम्या