पाचर्णे-धारिवाल दिलजमाईने राजकारणात बदल घडणार?

शिरूर, ता . १३ मार्च २०१६ (मुकुंद ढोबळे) : नुकतीच शिरूर येथील महशिवरात्र यात्रा व उद्योगपती प्रकाशभाऊ धारिवाल यांचा वाढदिवस यांत धारिवाल व आमदार बाबुराव पाचर्णे हे एकत्र येत शिरूर च्या विकासासाठी आम्ही काम सोबतच करू असे सांगून आमच्यावर प्रेम करणाऱ्याची नाहक परीक्षा कशाला असे सांगून अागामी  शिरूर नगर परिषद निवडणूक एकत्र लढण्याचे संकेत दिल्याने इच्छुकांची मात्र मोठी गोची होणार आहे.

काही महिन्यांवर शिरूर नगर परिषद निवडणूक आली असून, सध्या शिरूर शहरात उद्योगपती रसिकलाल धारिवाल यांची एक हाती सत्ता आहे. मागील निवडणुकीत आमदार बाबुराव पाचर्णे यांच्या पॅनलेच पूर्णपणे पराभव झाला होता. त्यावेळेस पाचर्णे आमदार नव्हते परंतु शिरूर शहरात धारिवाल यांना नेहमीच शिरूरकरांनी साथ दिली अाहे.

सध्या निवडणूक डोळ्यासमोर ठेऊन अनेक इच्छुकांनी आपापले नशीब अजमावण्यासाठी वेगवेगळे फंडे अाजमावणे सुरू केले आहेत. फ्क्लेक्सबाजी पासून ते जेवण, खर्च सुरू आहेत. परंतु गेल्या काही दिवसा पासून संपूर्ण शिरूर शहराची वातावरणात वेगळाच बदल झाल्याचे दिसून येते आहे. त्यामुळे अनेक इच्छुकांचे तोंडचे पाणी पळाले आहे तर अनेकांना झोपा लागत नसतील अशी परिस्थिती निर्माण झाली आहे.

शिरूरची महाशिवरात्र यात्रा व त्यालाच लागून आला उद्योगपती प्रकाशभाऊ धारिवाल यांचा वाढदिवस आणि संपूर्ण शहर फ्लेक्सने झाकून गेले. प्रत्येक इच्छुकांनी आपापले फ्लेक्स लावलेले होते. त्यात एका ग्रूपने या वाढदिवसाला व यात्रेच्या निमित्ताने पाचर्णे व धारीवाल याना एकत्र एकाच व्यासपीठावर  आणून त्यांच्या हस्ते रामलिंग मंदिरावर पुष्प व्रुष्टी व धारीवाल यांचा अभीष्टचिंतन सोहळा करण्यात आला.

या अभीष्टचिंतन सोहळ्यात धारिवाल यांचे जवळचे व सध्या शिरूर नगर परिषद येथील नगरसेवक विजय दुगड यांनी आपल्या भाषण सुरू असतांना संपूर्ण शिरूर शहराला पाचर्णे धारीवाल एकत्र यावे असे वाटते आहे व  केवळ पाच टक्के लोकांच्या पोटात दुखणार आहे असा टोला हाणला होता. आमदार बाबुराव पाचर्णे यांचे समर्थक मराठा सेवा संघाचे अध्यक्ष नामदेव घावटे यांनी गेली आठ- नऊ  वर्षापासून धारिवाल व पाचर्णे यांना एकत्र आणण्याची काम करीत असून त्याचा साक्षीदार मी आहे आजचा योगायोग चांगला असल्याचे सांगून या युतीची दोघांच्या समर्थकांनी आपल्या भाषणात एकवाक्यता केली.
 
त्यात मग भाषण करण्यासाठी जिल्हापरिषद बांधकाम सभापती यांनी आपल्या भाषेत ही युती व्हावी यांसाठी दुजोरा दिला परंतु त्यांनी फाट्क्यात पाय घातला आणि माजी आमदार अशोक पवार यांचे नाव न घेता त्यांच्यावर टीका करून सापाची उपमा देऊन त्याला बाहेर काढा असे सांगितले .
 
यानंतर उद्योगपती प्रकाशभाऊ धारिवाल यांनी आपल्या भाषणात सावध पवित्रा घेऊन आमदार बाबुराव पाचर्णे हे आम्हाला विकास काम करताना मदत करतात असे सांगून त्याची मंत्रालय येथे कामा संदर्भात मदत होती. असे सांगताना काही ठिकाणी ते आमच्या बरोबरच कामाकरिता येत असतात असे सांगून पाचर्णे यांच्या सहकार्याबद्दल त्यांचे धन्यवाद मानताना आम्ही सर्वजण शिरूर शहरात राजकारण व्यवस्थित आहे असे सांगून फक्त बांद्ल तुम्ही आले तर इकडे बिघडते त्यामुळे तुम्ही आमच्यात पडू नका असा सल्ला देताना नक्की तुम्ही कोणाचे आहात हेच कळत नाही. कधी राष्ट्रवादी तर कधी अपक्ष तर कधी भाजप आज तुमचा शर्ट पाहून आणखी वेगळा पक्ष तर नाही ना असा टोला मारला तर एकत्र काम करण्यास त्यांनी समजदर पण मुद्दा घेतला.

आमदार बाबुराव पाचर्णे यांनी आपल्या भाषणात धारिवाल व पाचर्णे यांच्या संबध जुनेपिढी पासून आहेत हे उदाहरण देऊन दिले तर शिरूर शहराचा विकास प्रकाशशेठ यांच्या काळात चांगला सुरू असून राज्यात स्वच्छता पुरस्कार मिळाला. त्याचा व शिरूर शहराचा विकास याचा अभिमान असल्याचे सांगितले. शिरूर च्या विकासासाठी एकत्र येऊ असे जाहीर केले त्यात जैन स्पंदन ग्रूप च्या वतीने घेण्यात येणारे स्वर्गरथ लोकअर्पण सोहळा कार्यक्रमात आमदार बाबुराव पाचर्णे यांनी शेकडो व्यापारी व नागरिक यांच्या समोर तुम्ही सगळे लोक लोकसभा निवडणुकीत खासदार आढळराव पाटिल, विधानसभेत मला तर नगरपालिका निवडणूकमध्ये धारिवाल आमच्या तिघांच्या झोळीत भरभरून टाकतात मग आम्ही नगर पालिका निवडणूकीत तुमची तरी परीक्षा का घ्यायची? यापुढे नगरपालिका निवडणुकीत परीक्षा घेणार नाही असे सांगून एकत्र निवडणुक लढवण्याचा संकेत दिला यावेळी नागरिकांची मोठ्या टाळ्यांचा गजर केला.
 
शिरूर नगर पालिका निवडणुकीचे बिगुल वाजले असून एकाच दिवसात शहरातील राजकारणाचा सुर बदलाला असला तरी तरी माजी आमदार अशोक पवार व धारिवाल यांची सबंध सगळ्यांना माहिती आहे. परंतु, अशोक पवार हे शिरूर तालुक्यातील एक हुशार आणि धूर्त राजकारणी म्हणून ओळखले जाते. जरी धरिवाल -पाचर्णे युती झाली तरी ते वेगळी चुल मांडतील असे होणार नाही ते धारिवाल बरोबरच राहतील असा राजकीय जानकरांचे मत आहे. त्यात शहराचा विकास धारिवाल  कुटुंब स्वनिधी खर्च करुन करीत आहे व पुढील राजकारणात  त्याचा  त्यांना फायदाच होतो हे सर्वाना माहीती आहे.त्यामुळे पवार धारिवाल यांचे बरोबरच रहातील .
 
शिरूर शहरातील राजकारणात गेल्या दोन निवडणुकांत फूट पडणाऱ्यांचे मात्र यामुळे धाबे दणाणले आहे. निवडणुकीला अजून दहा महीने बाकी असतांना दहा महीने अगोदर राजकारण फिरले त्यात आपल्या सोंगट्या टाकायला वेळ दिला गेला नाही, यामुळे त्यांचा तीळपापड झाला आहे. या दहा महिन्यात आपल्या सोंगट्यांचा वापर करण्यासाठी ते प्रयत्न  करतील त्यासाठी यांचे  राजकारण कुठल्याही स्तराला जाईल कारण हे शकुनी मामा त्यात पटाईत आहे.

सध्या तरी शिरूर शहर व तालुक्यात पाचर्णे-धारिवाल यांच्या दिलजमाईची चर्चा असली तरी यामुळे अनेकांच्या पोटात दुखतं आहे तर अनेकांच्या तोंडाचे पाणी नक्कीच पळाले आहे हे खरे असले तरी आणखी दहा महिन्यात यात किती काड्या आणि खोडा घालण्याची कामे होतील हे पुढे सगळ्यांना कळणार आहे. परंतु, आज तरी शिरूर चे राजकारणात मोठी हालचाल सुरु झाली आहे.

Comment Box is loading comments...

Comment Box is loading comments...

संबंधित बातम्या