टाकळी हाजीच्या उपसरपंचाला अटक करण्याची मागणी

टाकळी हाजी, ता. १३ मार्च २०१६ (सुभाष शेटे / सतीश केदारी / तेजस फडके) : या परिसरातील तरुणीला लग्नाचे आमिष दाखवून बलात्कार केल्याच्या आरोप असलेला येथील उपसरपंच अारोपी अजित गावडे याला लवकरात लवकर अटक करा, अशी मागणी शिवसेनेने टाकळी हाजी पोलिस स्टेशनला अाज (रविवार) लेखी निवेदनाद्वारे  केली. शिवाय, शिरूरचे माजी अामदार पोपट गावडे यांच्यासह दोघांनी दमदाटी केल्याची तक्रार पीडितेच्या कुटुंबियांन केली अाहे.

सविस्तर माहिती अशी की, अजित सोनभाऊ गावडे हा टाकळी हाजी गावचा उपसरपंच आहे. पीडित तरुणी  हि नजीकच्या गावतील रहिवासी अाहे. परंतु, पुण्यातील एका रुग्णालयात नर्स म्हणून काम करत आहे. अजितने पीडित तरुणीला लग्नाचे आमिष दाखवून तिच्याशी शारीरिक संबंध प्रस्थापित केले होते. परंतु, त्याचे लग्न ठरल्यामुळे त्यांच्यात वाद सुरू होता. ते दोघे जण शिवाजीनगर (पुणे) येथील एका हॉटेलमध्ये गुरुवारी भेटले. त्या वेळी अजितने तरुणीला त्याचे 25 मार्च रोजी लग्न असल्याचे सांगितले. त्यानंतर दोघांमध्ये भांडण झाले. अजितने तिला मारहाण केली होती. त्यानंतर तरुणीने शिवाजीनगर पोलिस ठाण्यात फिर्याद दिली अाहे. उपसरपंच अजित हा माजी आमदार पोपटराव गावडे यांचा नातू आहे.

यासंबंधी अाज पीडितेच्या कुटुंबियांनी दिलेल्या तक्रारीत अारोपीच्या कुटुंबियांनी तक्रार तुम्ही मिटवून घ्या. ३०२ गुन्हा केलेले अारोपी सुटतात तर या केसमध्ये काय अाहे? तक्रार मागे घ्या असे म्हणत दमदाटी केली. पीडितेच्या कुटुंबियांनी या  प्रकरणी पोपट हरिबा गावडे, राजेंद्र पोपट गावडे, रतन बाजीराव गावडे यांच्यावर टाकळी हाजी पोलिस स्टेशनला तक्रार दिली अाहे.

या गंभीर प्रकारणाची अाज शिवसेनेने तातडीने दखल घेत शिवसेना जिल्हा महिला अाघाडी व विविध तालुक्याच्या पदाधिका-यांनी पीडित कुटुंबियांची भेट घेऊन या प्रकरणाचा निषेध केला. अारोपीला लवकरात लवकर अटक करण्याची मागणी करुन कार्यवाहीत दिरंगाई झाली तर शिवसेना स्टाईलमध्ये कार्यवाही केल्याशिवाय राहणार नाही, असा लेखी इशारा निवेदनाद्वारे दिला अाहे. शिवाय, पीडितेला न्याय मिळवून देण्यासाठी शिवसेना या कुटुंबियांच्या मागे खंबीर उभी अाहे, असे शिवसेनेच्या पदाधिका-यांनी www.shirurtaluka.com शी बोलताना सांगितले.

यावेळी महिला अाघाडीच्या जिल्हा संघटक श्रद्धाताई कदम, तालुकाप्रमुख पोपट शेलार, खेडच्या नंदा कड, हवेलीच्या अलका सोनवणे, संगीता विकारे, अाशा गायकवाड, अमृता पठारे, पुनम पोतले, वंदना पोटे, संगिता शिंदे, अलका निचित, रेश्मा शेख, कुमुद धर्माधिकारी, गणेश जामदार, रोहित कुरुंदळे, माउली घोडे, महादेव भाकरे, कुंडलिक पवार अादी शिवसैनिक व पिडितेचे कुटुंबिय उपस्थित होते.
 
दरम्यान, टाकळी हाजी पोलिस स्टेशनला परिसरातील नागरिक व महिलांनी  मोठ्या प्रमाणावर  गर्दी  केली होती.
 
Comment Box is loading comments...

Comment Box is loading comments...

संबंधित बातम्या