शंकेश्वर परिवर्तन पॅनेल चा १३-० ने एेतिहासिक विजय

शिरसगाव काटा, ता.१३ मार्च २०१६ (प्रतिनीधी) : येथील सोसायटीच्या निडणुकीत शंकेश्वर परिवर्तन पॅनेल ने परिवर्तन घडवून १३-० ने एेतिहासिक विजय मिळवत एकहाती सत्ता प्राप्त केली. संकेतस्थळाने याबाबत दिलेला अंदाज तंतोतंत खरा ठरला अाहे.

विजयी शंकेश्वर सहकार परिवर्तन पॅनेलची धुरा राष्ट्रवादीचे तालुका उपाध्यक्ष नरेंद्र माने, शिरुर तालुका युवक कॉंग्रेसचे अध्यक्ष श्री. विजेंद्र सुभाष गद्रे तसेच माणिक कदम, रामचंद्र केदारी, दत्तु काटे, विकास जगताप, सरपंच संजय शिंदे, एम. एस. कदम,बाळअण्णा कदम, यांच्यासह माजी संचालक सुभाष गद्रे, सुभाषदादा फराटे अादी ज्येष्ठ मंडळी सांभाळत होती.

या निवडणुकीसाठी सर्वसाधारण खातेदार कर्जदार यांमधुन नरेंद्र अण्णासो माने, पांडुरंग गणपत चव्हाण, सचिन दत्तात्रय जगताप, विनायक दगडू जगताप, अण्णासाहेब बबन कदम, स्वप्नील जनार्दन काटे, हनुमंत बाळासो माने, जाफर नबीबभाइ शेख तर अनुसुचित प्रवर्गात निखिल नारायण गायकवाड, महिला प्रतिनिधी मधुन संगिता दिलीप कदम, वच्छलाबाई सोमनाथ शिंदे  इतर मागास प्रवर्गातून दिगंबर तुकाराम लोणकर व भटक्या विमुक्त प्रवर्गातून जयशिंग शंकर  जाधव हे उमेदवार  निवडणुकीच्या रिंगणात होते .

"छत्री" या चिन्हावर निवडणूक लढवत असलेल्या या परिवर्तन पॅनेलला मतदारांचा देखील प्रचंड प्रतिसाद मिळत होता.हे चित्र अगदी स्पष्ट दिसत असल्याने संकेतस्थळ www.shirurtaluka.com ने अचुक वार्तांकन करत निवडणुकीची सविस्तर बातमी प्रसिद्ध केली होती. हा अंदाज खरा ठरत अाज या पॅनेल चे सर्वच उमेदवार मोठ्या फरकाने निवडून अाले अाहे.

अाज सकाळी ९ वाजता मतदान प्रक्रिया शांततेत सुरु झाली होती. दिवसभर मतदारांनी देखील शांततेत मतदान केले. या वेळी मांडवगणचे सहायक उपनिरिक्षक विठ्ठल लडकत, अंकुश चौधरी या पोलीस कर्मचा-यांनी चोख बंदोबस्त ठेवला होता. या निवडणुकीसाठी निवडणुक निर्णय अधिकारी म्हणुन एस.एम. गव्हाणे  यांनी काम पाहिले. निवडीनंतर फटाके फोडून व गुळ वाटुन कार्यकर्त्यांनी अानंद साजरा केला.

विजयी उमेदवारपुढिलप्रमाणे नावे व पडलेली मते :
नरेंद्र अण्णासो माने: ५०३ , पांडुरंग गणपत चव्हाण: ४९७, सचिन दत्तात्रय जगताप : ५०३, विनायक दगडू जगताप :४८३, अण्णासाहेब बबन कदम : ५०१ , स्वप्नील जनार्दन काटे : ४९२ , हनुमंत बाळासो माने : ४९५ , जाफर नबीबभाइ शेख : ४७९,  तर अनुसुचित प्रवर्गात निखिल नारायण गायकवाड : ४९९ , महिला प्रतिनिधी मधुन संगिता दिलीप कदम : ५२१, वच्छलाबाई सोमनाथ शिंदे: ५०१  इतर मागास प्रवर्गातून दिगंबर तुकाराम लोणकर : ५०४  व भटक्या विमुक्त प्रवर्गातून जयशिंग शंकर  जाधव : ५०१ अशी मते वरील उमेदवारांना पडलेली अाहेत. ११९५ मतांपैकी ९६६ मतदारांनी हक्क बजावला अाहे.
Comment Box is loading comments...

Comment Box is loading comments...

संबंधित बातम्या