दहिवडीच्या तलाठ्याला लाच घेताना रंगेहाथ पकडले

दहिवडी, ता. १४ मार्च २०१६ (मुकुंद ढोबळे, विशेष प्रतिनीधी) : येथील जागेच्या वाटणीची नोंद करण्यासाठी वीस हजारांची लाच मागणाऱ्या कामगार तलाठी आशिष कृष्णा पवार (वय 27, कामगार तलाठी, दहीवडी, ता. शिरूर ) याला शिरूर प्रशासकीय इमारतीत आवरात लाचलूचपत विभागाचे पोलिस उपअधिक्षक कांचन जाधव यांच्या पथकाने रंगेहाथ पकडले आहे. याबाबत शिरूर पोलिस स्टेशन येथे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत लाचलूचपत विभागाचे पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, दहीवडी येथील तक्रारदार यांच्या जागेची विभागणी झाली आहे. सदर वाटणी पत्राची नोंद घेण्यासाठी  तक्रारदार यांनी दहीवडी तलाठी कार्यालयात अर्ज केला होता. परंतु, ही नोंद घेण्यासाठी तलाठी आशिष पवार यांनी वीस हजार रुपयांची मागणी केली होती. याबाबत तक्रारदार यांनी लाचलूचपत विभाग, पुणे येथे तक्रार दाखल केली होती.

या तक्रारीची पडताळणी केल्यानंतर लाचलूचपत विभागाचे पोलिस अधीक्षक शिरीष सरदेशपांडे यांच्या मार्गदर्नाखाली पोलिस उपअधिक्षक कांचन जाधव, पोलिस निरीक्षक अरुण घोडके, पोलिस कर्मचारी नवनाथ माळी, स्वाती जगताप, भाऊसाहेब लोंढे या पथकाने शिरूर येथील नवीन प्रशासकीय इमारत येथे तक्रारदार व पंच यांच्यासह सापळा रचला होता.

यावेळी तलाठी आशिष पवार याला तक्रारदार यांच्याकडून वीस हजार रुपयांची लाच घेताना रंगेहात पकडण्यात आले असून, शिरूर पोलिस स्टेशन येथे लाचलूचपत कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
Comment Box is loading comments...

Comment Box is loading comments...

संबंधित बातम्या