एमआयडिसीकडून पाणीपुरवठा कमी प्रमाणात; बाटली तेजीत

रांजणगाव गणपती, ता. 15 मार्च 2016 (पोपट पाचंगे)- रांजणगाव एमआयडिसी परिसरात एकीकडे मोठया प्रमाणात पिण्याचे पाणी तर दुसरीकडे माञ हे पाणी दुषित स्वरूपात येत आहे. परिसरात सध्या बाटली बंद पाण्याचा व्यवसाय तेजीत सुरू असल्याचे दिसून येत आहे. या दुषित पाण्यामुळे नागरिकांना उलटया, जुलाब व पोटदुखीचा ञास होत असल्याचे दिसून येत आहे.

रांजणगाव एमआयडिसीतील कंपन्या, ढोकसांगवी, कारेगाव व रांजणगाव गणपती या प्रकल्पग्रस्त गावांना शिंदोडी येथील धरणातून एमआयडीसी पाणी पुरवठा करण्यात येत आहे. यातील रांजणगावला कोंढापुरी येथील तलावातून पाणीपुरवठा होत असल्याने रांजणगावला सध्या एमआयडिसीकडून पाणीपुरवठा होत नाही. माञ, ढोकसांगवी व कारेगाव या गावांना पुरविण्यात येणारे पाणी हे धरणातूनच कमी झाल्याचे कारण पुढे देत एमआयडिसी कार्यालयाने पाण्यात कपात केली असल्याचे ग्रामपंचायत पदाधिकारयांनी सांगितले. त्यात अत्यल्प पाणीपुरवठा आणि येणारे पाणी मोठया प्रमाणात दुषित येत असल्याने नागरिक आजाराने ञस्त झाले आहेत. हे पाणी म्हणजे असून अडचण, नसून खोळंबा झाल्यासारखेच आहे. त्यामुळे या ग्रामस्थांना स्वच्छ पाण्यासाठी 35 रूपयाचे बाटलीबंद पाणी विकत घेतल्याशिवाय पर्यायच नसल्याचे दिसून येत आहे. एमआयडिसीकडूनच पाणी कमी येत असल्याने आमचाही पाण्याबाबत नार्इलाज असल्याचे कर्मचारी सांगतात.

ढोकसांगवी आणि कारेगाव येथे कमी पण तोदेखील दुषित पाणीपुरवठा असल्याने येथील नागरिकांना पिण्यासाठी बाटलीबंद पाणी विकत घेतल्याशिवाय पर्यायच उरला नसल्याने नागरिकांनी चिंता व्यक्त आहे. त्यामुळे पिण्यासाठी पाणी मिळणे कठीण झाले आहे. यामुळे बाटलीबंद पाण्याचा व्यवसाय करणारयांना सध्या ‘अच्छे दिन’ आले असल्याचे चिञ आहे. एमआयडिसीला पाणीपुरवठा करणाऱया या पार्इपलार्इनला अनेक ठिकाणी मोठया प्रमाणात गळती लागली असून ती गळती थांबवून हा पाणीपुरवठा पुन्हा सुरळीत करण्याची मागणी स्थानिक नागरिकांनी केली आहे.
Comment Box is loading comments...

Comment Box is loading comments...

संबंधित बातम्या