अत्याचार प्रकरणातील पीडित तरुणीचा आत्महत्येचा प्रयत्न

पुणे, ता. १७ मार्च २०१६ : टाकळी हाजीच्या उपसरपंचाने बलात्कार केलेल्या अत्याचार पिडित तरुणीने झोपेच्या गोळ्या घेऊन आत्महत्येचा प्रयत्न केल्याची घटना मंगळवारी मध्यरात्री विश्रांतवाडीमध्ये घडली अाहे.
 
मिळालेल्या माहितीनुसार मंगळवारी मध्यरात्री संबंधित तरुणीने झोपेच्या गोळ्या घेउन अात्महत्येचा प्रयत्न केला.मात्र नातेवाइकांनी ताबडतोब दवाखान्यात दाखल केले.सध्या पुण्यातीलच एका खासगी रुग्णालयात तिच्यावर उपचार सुरू आहेत.तर पिडित तरुणी ची प्रक्रती स्थिर अाहे. यासंदर्भात  पोलिसांनी तिने लिहून ठेवलेली सुसाईड नोट ताब्यात घेतली.

माजी अामदार पोपट गावडे यांचा नातु असलेला टाकळी हाजीचा उपसरपंच अजित सोनाभाऊ गावडे  याच्याविरुद्ध शिवाजीनगर पोलीस ठाण्यात बलात्काराचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुण्यातील एका हॉस्पिटलमध्ये परिचारिकेचे काम करणार्‍या या तरुणी ने अजित गावडे च्याविरुद्ध फिर्याद दिली आहे.

प्रेमसंबंधांमधून अजितने शीतपेयामधून गुंगीचे औषध दिले. त्यानंतर तिच्यावर बलात्कार केला. त्याचे त्याने चित्रीकरणही केले होते. हे चित्रीकरण व्हॉट्सअँपवर 'वायरल' करण्याची धमकी देऊन तिच्यावर त्याने अनेकदा बलात्कार केल्याचे तरुणीने फिर्यादीत म्हटले आहे.

तर अारोपी अजित अद्याप फरार असुन असुन अाज या संदर्भात  जामिन अर्जावर सुनावणी होणार अाहे.
Comment Box is loading comments...

Comment Box is loading comments...

संबंधित बातम्या