माजी अामदार पोपटराव गावडेंसह तिघांवर गुन्हे दाखल

पुणे, ता. १८ मार्च २०१६ (प्रतिनीधी) : सोशल नेटवर्किंगवर व्हिडिओ क्लिप अपलोड करण्याची धमकी देऊन तरुणीवर अत्याचार करणारा टाकळी हाजी गावचा उपसरपंच अजित सोनभाऊ गावडे (वय 23) याच्यासह चौघांवर विश्रांतवाडी (पुणे) पोलिस ठाण्यात गुरूवारी रात्री गुन्हा दाखल झाला आहे.

यामध्ये अजित गावडेचे आजोबा व शिरूर तालुक्याचे माजी आमदार पोपटराव गावडे, चुलते राजेंद्र पोपटराव गावडे, आई सुनिता यांचा समावेश आहे. याप्रकरणी अारोपीच्या जामीन अर्जावरील सुनावणी १९ मार्चला होणार अाहे.
 
टाकळी हाजी येथील उपसरपंच अजित गावडे  याने याच परिसरातील पुण्यात वैद्यकिय क्षेत्रात काम करणा-या तरुणीवर केलेल्या अतिप्रसंगाचे व्हिडीओ आणि फोटो सोशल मीडियावर व्हायरल करण्याची धमकी देऊन तरुणीवर वेळावेळी अत्याचार केला होता. याप्रकरणी  अजित गावडे आणि इतर तिघांच्या त्रासाला कंटाळून तरूणीने मंगळवारी झोपेच्या गोळया खावून आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला होता. मात्र, तरूणीच्या नातेवाइकांनी तिला वेळेत रूग्णालयात दाखल केल्याने तिचे प्राण वाचले. दरम्यान, तरूणीने झोपेच्या गोळया खाण्यापुर्वी सुसाईड नोट लिहून ठेवली होती. या सुसाइड नोट मध्ये जिविताला धोका झाल्यास  पोपटराव गावडे, सुनिता गावडे, राजेंद्र गावडे व अजित गावडे हे माझ्या मृत्यूला जबाबदार असतील असे तिने नमुद केले होते. या प्रकारानंतर बुधवारी विश्रांतवाडी पोलिसांनी रूग्णालयात जावून तरूणीचा जबाब नोंदविला.
 
अजित गावडे याच्याविरुध्द शिवाजीनगर पोलिस ठाण्यात 11 मार्च रोजी बलात्काराचा गुन्हा दाखल झाला. त्यानंतर तरूणीच्या कुटूंबियांना  अारोपीच्या कुटुंबीयांकडून धमक्या येण्यास सुरवात झाली होती. त्याबाबत तरूणीच्या कुटूंबियांनी टाकळी हाजी येथील पोलिस चौकीत त्याबाबत तक्रार दिली. या होणा-या त्रासाला कंटाळून तरूणीने झोपेच्या गोळया खावून आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला होता. अखेर  विश्रांतवाडी पोलिस ठाण्यात तरूणीने सुसाईड नोटमध्ये लिहीलेल्या चार जणांविरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला.

या प्रकरणात अारोपी अजित गावडे याने  अटकपूर्व जामीनासाठी अर्ज केला होता. यासाठी  सरकारी पक्षाला बाजू मांडण्याचे आदेश गुरुवारी न्यायालयाने दिले. या जामीन अर्जावर पुढील सुनावणी अथवा निर्णय 19 मार्च रोजी होणार आहे. तर सरकारी पक्षाच्या वतीने जिल्हा सरकारी वकील उज्ज्वला पवार आणि अतिरिक्‍त सरकारी वकील संजय पवार हे काम पाहत आहेत.

अजितची आई सुनिता या शिरूर पंचायत समितीच्या माजी महिला व बाल कल्याण समितीच्या सभापती आहेत. चुलती मनीषा राजेंद्र गावडे या शिरूर नगर पालिकेच्या नगराध्यक्षा  आहेत.
Comment Box is loading comments...

Comment Box is loading comments...

संबंधित बातम्या