ओवेसी व जलीलचा शिरुर शहरात शिवसेनेनेकडून निषेध

 शिरूर, ता . १८ मार्च २०१६ (मुकुंद ढोबळे) : "भारत माता की जय" म्हणण्यास नकार देणारे एमायएम चे असदुद्दीन ओवेसी व आमदार वारीस पठाण  जलील यांचा आज शिरूर शहर शिवसेनेच्या वतीने निषेध करून ओवेसीच्या प्रतिकात्मक पुतळयाचे दहन करण्यात अाले.

यावेळी बोलताना शहर प्रमुख संजय देशमुख म्हणाले की शिवसेना सर्व जाती धर्माला बरोबर घेणारा पक्ष असून,जर देशा विरोधात कोणी अपमानास्पद उदगार काढत असेल तर शिवसेना आपल्या पध्दतीने त्याला उत्तर देते.ओवेसी व त्यांचे आमदार यांचे हिंदुस्तानचे  नागरिकत्व रद्द करून त्यांना पाकिस्तान मधे पाठवून द्या अशी मागणी यावेळी अांदोलकांनी केली.

शिरूर शहर शिवसेना यांच्या वतीने आज शिरूर नगर परिषद कार्यालयासमोर ओवेसी यांचा पुतळा आणला. यावेळी भारत माता की जय, इस देश मे रहेना है तो वंदे मातरम कहेना होगा, ओवेसी मुर्दाबाद, शिवसेना झिंदाबाद अादी घोषणा देत निषेध करत पुतळा जाळण्यात अाला.

यावेळी शिवसेना शहर प्रमुख संजय देशमुख,उपतालुका प्रमुख कैलाश भोसले, वाहतूक सेनेचे बलराज मल्लाव, शहर भाजपा अध्यक्ष केशव लोखंडे, योगेश ओव्हाळ, राजेंद्र शिंदे, मयूर थोरात, सुनिल जठार, रुपेश राकेचा, सुरेश गाडेकर, मंगेश खान्डरे, मितेश गादिया, अमोल पवार, राजेंद्र परदेशी, महेश बोरा, सोनू काळोखे, निलेश जाधव, राजू जाधव, विनोद मदने, हितेश शहा, अमित भोर, अक्षय रासने, सागर अडागळे, नितीन जामदार, संतोष पवार, निखिल केदारी, व्यंकटेश जोशी, खुशाल भगत व शिवसैनिक उपस्थित होते.
Comment Box is loading comments...

Comment Box is loading comments...

संबंधित बातम्या