पुणे जिल्हा मध्यवर्ती बॅंकेकडून ६८ सहकारी संस्थांचा सन्मान

शिरूर, ता . १८ मार्च २०१६ (प्रमोद राजगुरु) : पुणे जिल्हा मध्यवर्ती बॅंकेकडून चालु अार्थिक वर्षात ९०% व त्याहुन जास्त परतफेड करणा-या ६८ संस्थांचा अाज  सन्मान करण्यात अाला.

शिरुर तालुक्यात सुमारे १२८ विविध कार्यकारी सेवा सहकारी संस्था अाहेत. चालू वर्षात ९०% व त्यापेक्षा जास्त रक्कम परतफेड करणा-या तालुक्यातील संस्थांची यासाठी निवड करण्यात अाली होती. या सहकारी संस्थांसाठी चांगले काम करणा-या अध्यक्ष व सचिवांना प्रोत्साहनपर पाच हजार रुपये बक्षिस म्हणून देऊन सन्मानित करण्यात अाले.

या वेळी बॅंकेच्या संचालिका डॉ. वर्षा शिवले, निवृतीअण्णा गवारे, अरुण काळे अादींनी मनोगते व्यक्त केली.

या कार्यक्रमाला देखरेख संघाचे डि. शिंदे, संचालक बाबासो निचित, दत्तात्रेय कदम, सचिव संघटनेचे गोपिनाथ पोटावळे, सरव्यवस्थापक अरुण काळे, विभागीय अधिकारी थोरात, वसुली अधिकारी नवले, टेवगिरे तसेच संचालक, विविध संस्थांचे चेअरमन, सचिव व बॅंकांचा अधिकारी वर्ग मोठ्या प्रमाणावर उपस्थित होता.
Comment Box is loading comments...

Comment Box is loading comments...

संबंधित बातम्या