निमोणेत शेतकऱयाचा मृतदेह अाढळल्याने खळबळ

निमोणे, ता. १९ मार्च २०१६ (प्रतिनीधी) : येथील एका शेतकऱयाचा मृतदेह विहिरीत अाढळल्याने खळबळ उडाली अाहे. उत्तम जयवंत काळे (वय ६३) असे मृत शेतक-याचे नाव अाहे.

शिरुर पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, गुरुवारी (ता. १७) रात्री शेतातील पिकांना पाणी देण्यासाठी उत्तम काळे हे मोटेवाडी रस्त्यानजीक त्यांच्या शेतात गेले होते. माघारीची वेळ झाला तरी ते न अाल्याने त्यांना पाहण्यासाठी पत्नी मीरा या शेतात राहणा-या त्यांचा पुतण्या संतोष बापुराव काळे याला सोबत घेऊन शोधत होत्या. त्यावेळी विहिरीच्या कडेला सायकल दिसली. विहिरीत डोकावले असता चप्पल व गळ्यातील तुळशीची माळ पाण्यावर तरंगत असलेली निदर्शनास अाली. यानंतर परिसरातील नागरिकांनी विहिरीत उतरुन त्यांना बाहेर काढले. शिरुर येथे शवविच्छेदन झाल्यानंतर अत्यंसंस्कार करण्यात अाले.

या प्रकरणी पुढील तपास भगवान निंबाळकर यांच्या मार्गदर्शनाखाली हवालदार गायकवाड  करत अाहे.
Comment Box is loading comments...

Comment Box is loading comments...

संबंधित बातम्या