अत्याचार प्रकरणाच्या निषेधार्थ शिरुर ला शिवसेनेचा एल्गार

शिरूर, ता. १९ मार्च २०१६ (विशेष प्रतिनीधी) : सोशल नेटवर्किंगवर व्हिडिओ क्लिप अपलोड करण्याची धमकी देऊन तरुणीवर अत्याचार करणारा टाकळी हाजी गावचा उपसरपंच अजित सोनभाऊ गावडे (वय 23) याच्यासह  चौघांवर गुन्हे दाखल झालेल्या अारोपींना त्वरित अटक करावी, या मागणीसाठी करिता  शिवसेना महिला आघाडीच्या वतीने शिरूर तहसीलदार कार्यालयावर शनिवारी (ता. 19) भव्य मोर्चा काढण्यात आला होता.

या मोर्चाचे नेतृत्व महिला आघाडीच्या जिल्हा संपर्क प्रमुख विजयाताई शिंदे, जिल्हा संघटक श्रध्दाताई कदम यांनी केले. शिरूर बाजार समिती येथील छ्त्रपती शिवाजी महाराज पुतळ्याला पुष्पहार घालून या मोर्चास सुरवात झाली. गावडे कुटुंबीयांना अटक करा, पीड़ित तरूणी व तिच्या कुटुंबीयांना संरक्षण द्या, आरोपी अजित गावडे याला अटक करा, ही प्रमुख मागणी घोषणाद्वारे करण्यात अाली. याप्रसंगी  मोर्चातील महिला आक्रमक झाल्या होत्या.

यावेळी माउली घोडे, तालुका प्रमुख दादासाहेब खराडे, तालुका संघटक गणेश जामदार, तालुका संघटक संगीता शिंदे, राणीताई  चोरे, उप तालुका संघटक अलका सोणवणे, अर्चना सांडभोर, उर्मिला भुजबळ, विभाग संघटक वैशाली गायकवाड, अमृता पठारे, ज्योती राजपूत, सुप्रिया साकोरे, सुनिल जाधव, विशाल सरोदे, विनायक चौधरी, बबन गाडेकर, अनिल गोरडे, शिवाजी भोसले, प्रकाश गायकवाड, सोमा भाकरे व पीड़ित मुलीचे आई-वडील व मोठया प्रमाणात नागरिक उपस्थित होते .

टाकळी हाजी येथील उपसरपंच अजित गावडे  याने याच परिसरातील पुण्यात वैद्यकिय क्षेत्रात काम करणा-या तरुणीवर केलेल्या अतिप्रसंगाचे व्हिडीओ आणि फोटो सोशल मीडियावर व्हायरल करण्याची धमकी देऊन तरुणीवर वेळावेळी अत्याचार केला होता. याप्रकरणी  अजित गावडे आणि इतर तिघांच्या त्रासाला कंटाळून तरूणीने झोपेच्या गोळया खावून आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला होता. मात्र, तरूणीच्या नातेवाइकांनी तिला वेळेत रूग्णालयात दाखल केल्याने तिचे प्राण वाचले. दरम्यान, तरूणीने झोपेच्या गोळया खाण्यापुर्वी सुसाईड नोट लिहून ठेवली होती. या सुसाइड नोट मध्ये जिविताला धोका झाल्यास  पोपटराव गावडे, सुनिता गावडे, राजेंद्र गावडे व अजित गावडे हे माझ्या मृत्यूला जबाबदार असतील असे तिने नमुद केले होते. या प्रकारानंतर बुधवारी विश्रांतवाडी पोलिसांनी रूग्णालयात जावून तरूणीचा जबाब नोंदविला. या सर्वांनाच अटक व्हावी अशी मागणी घेऊन आज मोर्चा काढण्यात आला होता

शिरूरचे तहसीलदार राजेंद्र पोळ व शिरूरचे सहायक पोलीस निरीक्षक उत्तमभजनावळे यांना यावेळी  अांदोलकांनी निवेदन दिले. यावेळी बोलताना शिवसेनेच्या विजयाताई शिंदे म्हणाल्या, 'छ्त्रपतींच्या महाराष्ट्रात सर्वसामान्य महिलेवर अन्याय करणारी गावडे हे आपल्या तालुक्यातील आहे, याची लाज वाटते. सर्वसामान्यांना न्याय देण्यासाठी शिवसेना नेहमी बरोबर असून अत्याचारी महिला च्या कुटुंबीय यांना संरक्षण द्या  व त्यांना धमाकावणा-यांस अटक करा हीच मागणी या वेळी बोलताना केली.'

...तर शिवसेना कायदा हातात घेईल
पीड़ित मुलीच्या घरच्यांना संरक्षण दिले नाही आणि काही प्रकार या गुन्हेगार यांच्याकडून घडला तर शिवसेना महिला आघाडी कायदा हातात घेईल व त्यांची सर्व जवाबदारी पोलीस यांची राहील असा इशारा या वेळी महिला अाघाडी च्या वतीने देण्यात आला.

प्रतिक्रिया नोंदविण्यासाठी येथे क्लिक करा

Comment Box is loading comments...

संबंधित बातम्या