गावडेच्या अटकपूर्व जामीन अर्जावर होणार सुनावणी

पुणे, ता. २१ मार्च २०१६ (प्रतिनीधी) : डोंगरगण येथील युवतीवर बलात्कार केल्याच्या गुन्ह्यात टाकळी हाजी गावचा उपसरपंच आणि शिरूरचे माजी आमदार पोपटराव गावडे यांचा नातू अजित सोनाभाऊ गावडे याच्या अटकपूर्व जामीन अर्जावर अाज  न्यायालयात सोमवारी (ता. 21) सुनावणी होणार अाहे.

अतिरिक्त सत्र न्यायाधीश ए. एस. आपटे यांच्यासमोर या अर्जावर सुनावणी सुरू आहे. अजित गावडे विरुद्ध शिवाजीनगर पोलिस ठाण्यात बलात्काराचा गुन्हा दाखल झाला असून, शिरुर तालुक्यातील डोंगरगण येथील पीडित युवती पुण्यातील  एका मोठ्या रुग्णालयात परिचारिका म्हणून काम करते. पिडित युवतीने दिलेल्या तक्रारीत अजितने तिला शीतपेयातून गुंगीचे औषध देऊन बलात्कार केला आणि त्याचे चित्रीकरण केले. हे चित्रीकरण प्रसारित करण्याची भीती दाखवित अनेकवेळा बलात्कार केल्याचे युवतीने तक्रारीत नमूद केले आहे.

नुकताच या युवतीने आत्महत्येचा प्रयत्न केला होता. गावडेतर्फे ऍड. श्रीकांत शिवदे यांनी बाजू मांडली, तर पोलिसांतर्फे जिल्हा सरकारी वकील उज्ज्वला पवार यांनी अटकपूर्व जामीन अर्ज मंजूर करू नये, अशी मागणी केली होती.
शिरुर च्या राजकारणात मोठी बडी अासामी समजल्या जाणा-या गावडे कुटुंबीयांच्या सदस्यांनी पिडितेच्या कुटुंबियांना धमकावले होते.या प्रकरणी पिडितेच्या कुटुंबियांनी टाकळी हाजी पोलीस स्टेशन ला तक्रार दाखल केली होती.नुकतेच शिवसेनेने अांदोलन करत या प्रकरणातील अारोपींना अटक करा व पिडितेच्या कुटुंबाला संरक्षण द्या असे म्हणत नुकतेच प्रशासनाला निवेदन दिलेले अाहे.

संपुर्ण जिल्हाभर गाजत असलेल्या या प्रकरणाकडे अनेकांचे लक्ष लागुन राहिले असुन अाज होणा-या सुणावणीत काय होणार? याची सगळ्यांना उत्सुकता लागुन राहिली अाहे.
Comment Box is loading comments...

Comment Box is loading comments...

संबंधित बातम्या