माजी आमदार पोपटराव गावडे यांना अंतरिम जामीन मंजूर

पुणे, ता. 25 मार्च 2016- व्हिडिओ क्लिक सोशल नेटवर्किंग साइटवर अपलोड करण्याची धमकी देऊन तरुणीवर अत्याचार करणारा टाकळी हाजी गावचा उपसरपंच अजित सोनभाऊ गावडे याच्यासह चौघांना बुधवारी (ता. 23) अंतरिम जामीन मंजूर झाला.

यामध्ये अजित गावडेचे आजोबा व शिरूरचे माजी आमदार पोपटराव गावडे यांनाही जामीन मिळाला आहे. जामीन मिळाल्यानंतर चौघांनी विश्रांतवाडी पोलिस ठाण्यात हजेरी लावल्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक पोपटराव सुपेकर यांनी सांगितले.
माजी अामदार गावडेंसह तिघांचा अटकपुर्व जामिनासाठी अर्ज
पुणे
, ता. २२ मार्च २०१६ (प्रतिनीधी)
: तरूणीला आत्महत्येस प्रवृत्त केल्याच्या प्रकरणात गुन्हा दाखल झालेले माजी आमदार पोपटराव गावडे यांच्यासह तिघांनी अटकपूर्व जामीनासाठी न्यायालयात अर्ज केला आहे.

या अर्जावर अतिरिक्त सत्र न्यायाधीश एल. एल. येनकर यांच्या न्यायालयात मंगळवारी सुनावणी होणार असून, अजित गावडे याने जामिनासाठी केलेल्या अर्जावर येत्या बुधवारी सुनावणी होणार आहे.

तरूणीवर बलात्कार केल्याप्रकरणी पोपटराव गावडे यांचा नातू अजित सोनभाऊ गावडे याच्यावर गुन्हा दाखल झाला आहे. त्यानंतर पिडीत तरूणीने झोपेच्या गोळ्य़ा खावून आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. यावेळी तिने लिहून ठेवलेल्या सुसाईड नोटमध्ये अजितसह पोपटराव गावडे राजेंद्र गावडे आणि सुनिता सोनभाऊ गावडे यांच्या नावांचा उल्लेख केला होता. त्यावरून त्यांच्यावर विश्रांतवाडी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. दरम्यान, शिवसेनेने अांदोलन करत  स्थानिक प्रशासनाचे या प्रकाराकडे लक्ष वेधले होते. संरक्षण पुरविण्याची मागणी देखील केलेली अाहे. परंतु पिडितेच्या कुटुंबाचा तक्रार मागे घेण्यासाठी अद्यापही छळ सुरु असून पीडितेच्या वडिलांनी रविवारी (ता. २०) पुन्हा रात्री शिरुर पोलिस स्टेशनला सुरेश चोरे यांच्याविरुद्ध तक्रार दिलेली अाहे.

या घटनेला दहा दिवस होउनही पोलिसांनी अद्याप अारोपींना अटक का केली नाही? असा सवाल होत अाहे. दुसरीकडे पीडितेच्या कुटुंबाला तक्रार मागे घेण्यासाठी धमकावण्याचे सत्र सुरुच असल्याने या प्रकरणात पुढे काय होणार? हा सवाल सर्वसामान्य जनतेकडून केला जात अाहे.

Comment Box is loading comments...

संबंधित बातम्या