'दामिनी पथक शिरुर शहरात नियुक्त करावे- यशस्विनी

शिरूर, ता. २३ मार्च २०१६ : शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी मुली व महिलांच्या सुरक्षिततेसाठी महिला बीट मार्शल 'दामिनी पथक' नियुक्त करण्याची मागणी यशस्विनी वेल्फेअर फौंडेशनच्या वतीने पुणे जिल्हा ग्रामीण पोलिस अधिक्षक डॉ. जय जाधव यांच्याकडे करण्यात आली आहे. या बाबतचे निवेदन पोलिस मुख्यालयात यशस्वीनिच्या  महिलांनी नुकतेच दिले अाहे.
 
जागतिक महिला दिनी पुणे पोलिस दलातून महिला व मुलींच्या संरक्षणासाठी दामिनी पथकाची निर्मिती करुन शहरातील गर्दीच्या तसेच शाळा, महाविद्यालयांच्या  ठिकाणी मुली व महिलांच्या मदतीसाठी धावून जाणा-या महिला बीट मार्शल अर्थात 'दामिनी' पथकांची स्थापना करण्यात अाली अाहे. हे पथक  गुन्हेगारांवर वचक बसविणार आहेत. शिरुर शहरात अद्याप या पथकाची स्थापना करण्यात अालेली नव्हती. हि बाब लक्षात घेत याच धर्तीवर शिरूर शहरात देखील  महिला व मुलींच्या संरक्षणासाठी महिला बीट मार्शल अर्थात 'दामिनी' पथकाची तातडीने नियुक्ती करावी, अशी आग्रही मागणी यशस्विनी सामाजिक अभियान व यशस्विनी वेल्फेअर फौंडेशनच्या वतीने पुणे जिल्हा ग्रामीण पोलिस अधिक्षक डॉ. जय जाधव यांच्याकडे निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.

पुणे पोलीस मुख्यालयात पोलिस निरीक्षक भगवान मुंडे यांच्याकडे निवेदन देण्यात आले. या वेळी यशस्विनिच्या दीपाली शेळके, नम्रता गवारे, कविता शिंदे, संगीता मल्लाव उपस्थित होत्या.
          
Comment Box is loading comments...

Comment Box is loading comments...

संबंधित बातम्या