माजी आमदार पोपटराव गावडे यांना अंतरिम जामीन मंजूर

पुणे, ता. २५ मार्च २०१६:  डोंगरगण येथील तरुणीला व्हिडिओ क्‍लिप सोशल नेटवर्किंगवर अपलोड करण्याची धमकी देऊन अत्याचार करणारा येथील उपसरपंच अजित सोनभाऊ गावडे याच्यासह तरुणीला अात्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी माजी अामदार गावडे यांच्यासह तिघांना बुधवारी अंतरिम जामीन मिळाला.

यामध्ये अारोपी अजित गावडे सह अजितचे आजोबा व शिरूरचे माजी आमदार पोपटराव गावडे, आरोपीचे चुलते राजेंद्र पोपटराव गावडे, अाई सुनिता गावडे  यांनाही जामीन मिळाला आहे. जामीन घेतल्यानंतर चौघांनी विश्रांतवाडी पोलिस ठाण्यात हजेरी लावली. तरुणीला अात्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी गावडे कुटुंबीयांवर गुन्हा दाखल झाला होता. तर अजित गावडेवर शिवाजीनगर पोलिस ठाण्यात बलात्काराचा गुन्हा दाखल आहे.

अजितला २५ हजारांचा जामीन मंजूर करण्यात अाला अाहे. माजी अामदार पोपटराव गावडे यांच्यासह प्रत्येकी तिघांना २० हजार रुपयांचा ३१ तारखेपर्यंत तात्पुरता अटकपुर्व  जामीन मंजुर करण्यात अाला अाहे.

या प्रकरणातील अारोपींचा जामीन फेटाळण्यात यावा, अशी मागणी  सरकारी वकील उज्जवला पवार, अतिरिक्त सरकारी वकील संजय पवार, जावेद शेख यांनी केली होती. गावडे कुटुंबियांच्यावतीने श्रीकांत शिंदे, सागर कोठारी, हेमंत चव्हाण, राहुल हरे, नारायण पंडीत यांनी जामीन मंजुर करण्याची मागणी केली होती.

या प्रकरणात पीडित युवतीने त्रासाला कंटाळून आत्महत्येचा प्रयत्न केला होता. गावडे कुटुंबियांने पिडितेच्या कुटुंबियांना धमकाविल्याने पिडितेच्या  पित्याने तक्रार दाखल केली होती.
Comment Box is loading comments...

Comment Box is loading comments...

संबंधित बातम्या