शिरसगावः चेअरमनपदी विनायक जगताप बिनविरोध

शिरसगाव काटा, ता.१३ मार्च २०१६ (प्रतिनीधी) : येथील विविध कार्यकारी सोसायटी च्या चेअरमनपदी विनायक जगताप तर व्हॉइसचेअरमनपदी जाफर शेख यांची बिनविरोध निवड करण्यात अाल्याची माहिती निवडणुक निर्णय अधिकारी एस.एम.गव्हाणे यांनी दिली.

या संदर्भात अाज दुपारी येथील ग्रामपंचायत कार्यालयात  बैठक घेण्यात अाली.या वेळी शिरुर तालुका युवक कॉंग्रेस चे तालुकाध्यक्ष व उपसरपंच विजेंद्र गद्रे,राष्ट्रवादी चे तालुकाउपाध्यक्ष नरेंद्र माने,सरपंच शिंदे,रामचंद्र केदारी,विकास जगताप,बाळासो कदम,सुरेश साळुंके,शिवाजी चव्हाण,माणिक कदम अादी मान्यवर उपस्थित होते.

नुकत्याच झालेल्या सोसायटीच्या निवडणुकीत जि.प.सदस्य दादासो कोळपे यांच्या पॅनेल ला धुळचारत शंकेश्वर परिवर्तन पॅनेल ने १३-० ने विजय मिळवत एकहाती सत्ता प्राप्त केली अाहे.

या निवडीसाठी अाज चेअरमन व व्हॉइस चेअरमन पदासाठी प्रत्येकी एकमेव अर्ज अाल्याने निवडणुक निर्णय अधिकारी एस.एम.गव्हाणे या दोघांची नावे जाहिर केली.

या निवडीनंतर संस्थेच्या विकासासाठी प्रयत्न करणार असल्याचे नवनिर्वाचित पदाधिका-यांनी www.shirurtaluka.com च्या प्रतिनीधीशी बोलताना सांगितले.

Comment Box is loading comments...

Comment Box is loading comments...

संबंधित बातम्या