वाघाळेः हॉलिबॉल स्पर्धेत जातेगावला प्रथम क्रमांक

वाघाळे, ता. 28 मार्च 2016- स्व. लक्ष्मण (नाना) कुंडलिक थोरात यांच्या स्मरणार्थ नुकतेच येथे भव्य डे-नाईट हॉलिबॉल स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी विविध गावांमधील दहा संघांनी स्पर्धेत सहभाग घेतला होता. 'कलासागर प्रतिष्ठान'च्या वतीने दोन दिवसीय स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते.

स्पर्धा पाहण्यासाठी परिसरातील युवकांनी मोठी गर्दी झाली होती. उत्साहवर्धक झालेल्या स्पर्धेत जातेगाव खुर्द येथील संघाने प्रथम, शिक्रापूर येथील संघाने द्वितीय तर गणेगाव येथील संघाने तृतीय क्रमांक मिळवला. भव्य चषक व रोख बक्षिस असे पुरस्काराचे स्वरूप होते.

यावेळी गावचे माजी आदर्श सरपंच कुंडलीकराव थोरात, उद्योगतपती विक्रम पाचुंदकर, किरण शिंदे, लहू थोरात, कांतीलाल थोरात, विविध कार्यकारी सोसायटीचे अध्यक्ष आनंदराव सोनवणे, ग्रामपंचायत सदस्य दिलीप थोरात, किसनराव गोरडे व भाऊसाहेब पवार उपस्थित होते. ओंकार थोरात, योगेश शेळके, संदिप धायबर, संतोष गोरडे, राजू शेळके, शरद शेळके, निलेश गोरडे, निलेश थोरात यांच्या संकल्पनेतून स्पर्धा साकारण्यात आली. शिक्षक दिलीप थोरात यांनी सूत्रसंचालन केले.
Comment Box is loading comments...

Comment Box is loading comments...

संबंधित बातम्या