...बांधकाम सभापतींनी भागविली गावाची तहाण!

शिरसगाव काटा,  ता. २९ मार्च २०१६ (सतीश केदारी) : जिल्हा परीषदेचे बांधकाम सभापती मंगलदास बांदल यांनी गावाला तातडिने पिण्याच्या पाण्याची सोय व्हावी म्हणुन दोन दिवसांतच हातपंप तातडी मंजुर केले.अन लगेचच काम सुरु होउन हातपंपाच्या कुपनलिकांना पाणी देखील लागल्याने  ग्रामस्थांनी समाधान व्यक्त केले अाहे.

जिल्हा परिषदेच्या अर्थसंकल्पानंतर प्रथमच जिल्हा परिषदे चे बांधकाम सभापती मंगलदास बांदल यांनी दुष्काळी गावांची पाहणी दौरा करत शिरसगाव  काटा येथे नुकतीच भेट दिली होती.या वेळी ग्रामस्थांनी पाण्याची होणारी टंचाइ बांदल यांच्या कानावर घातली होती.मंगलदास बांदल यांनी देखील ग्रामस्थांच्या समस्या समजुन घेत या गावाला तातडीने तीन हातपंप देखील मंजुर केले .तसेच त्वरीत योग्य ठिकाणे पाहुण हातपंपाचे काम सुरु करावेत असे सांगितले होते.त्यानुसार त्वरीत प्रशासनाने हातपंपांसाठी  पाहणी करुन कुपनलिका देखील खोदली.तसेच या भेटीवेळी अधिका-यांना काही सुचना करत ग्रामस्थांना गाव हागणदारीमुक्त करण्याचे अावाहन केले.

सध्या या सर्व कुपनलिकांना पाणी देखील लागले असुन ग्रामस्थांनी समाधान व्यक्त केले अाहे. तर बांदल यांनी तातडीने दखल घेतल्याने पाणी समस्या काही प्रमाणात दुर होणार असुन पाणी टंचाइ मोठ्या प्रमाणावर भेडसावत असताना ग्रामस्थांना काही प्रमाणात  दिलासा मिळाला असल्याचे उपसरपंच विजेंद्र सुभाष गद्रे यांनी सांगितले.

Comment Box is loading comments...

Comment Box is loading comments...

संबंधित बातम्या