'साईकृपा'च्या लेखी अाश्वासनानंतर अांदोलन स्थगित

शिरूर, ता. ३० मार्च २०१६ ( तेजस फडके / सतीश केदारी): साईकृपा साखर कारखाना हिरडगाव (ता. श्रीगोंदा) या कारखान्याच्या व्यवस्थापनाने पैसे देण्याचे लेखी अाश्वासन दिल्याने शेतक-यांचे गेल्या चार दिवसांपासून सुरु असलेले अांदोलन अाज स्थगित करण्यात अाले.

या संदर्भात शिवसेनेचे शेतकरी तालुकाप्रमुख योगेश ओव्हाळ यांनी माहिती देताना सांगितले कि, साईकृपा साखर कारखाना हिरडगाव (ता. श्रीगोंदा) या साखर कारखान्याने तालुक्यातील अनेक गावांची उसाची बिले गेल्या अनेक दिवसांपासून थकविलेली होती. या विरोधात शिरुर तहसिल कचेरीसमोर गेल्या चार दिवसांपासून शेतक-यांसह शिवसेनेचे अांदोलन सुरु होते. या पुर्वी शिंदोडीतील शेतक-यांनी अांदोलन केले होते. त्या शेतक-यांना रक्कम मिळाली होती तसेच वाघाळे येथील शेतकरी देखील अांदोलनात उतरले होते. त्याचबरोबर जातेगाव, पिंपळसुटी अादी मिळून सुमारे बारा गावे उसबिलांपासून वंचित होती.
अाज कारखान्याने लेखी दिलेल्या पत्रात तालुक्यातील उर्वरीत ऊसउत्पादकांचे उसबिलाची रक्कम ११/०४/२०१६ पर्यंत अदा करणार असल्याचे पत्र दिल्याने अाज अांदोलकांनी माघार घेत अांदोलन स्थगित केले. शिरुरचे तहसिलदार राजेंद्र पोळ, पोलिस निरिक्षक भगवान निंबाळकर यांनी अांदोलकांची भेट घेऊन हे पत्र स्वाधीन करत अांदोलन मागे घेण्याची विनंती केली. अांदोलकांनी देखील मान्य करत अांदोलन मागे घेतले.

यावेळी शिवसेनेचे पदाधिकारी व तालुक्यातील  अनेक शेतकरी उपस्थित होते. योगेश ओव्हाळ यांनी याही  अांदोलनाला चौथ्याच दिवशी यश अाल्याने समाधान व्यक्त करत असल्याचे www.shirurtaluka.com शी बोलताना सांगितले. 

Comment Box is loading comments...

संबंधित बातम्या