अाता दुध ही झालयं कडू...

शिरसगाव काटा,  ता. ४ एप्रिल २०१६ (सतीश केदारी) : दिवसेंदिवस उन्हाळ्याची तिव्रता वाढतच चालल्याने याचा मोठा फटका दुध उत्पादकांना बसत असून दुध उत्पादनात मोठी घट होऊ लागली अाहे.

शिरुर तालुक्याच्या पुर्व व पश्चिम पट्ट्यात दुधाचं उत्पादन मोठ्या प्रमाणावर घेतले जाते. दिवसेंदिवस वाढतच चाललेल्या उष्णतेचा परिणाम दुध धंद्यावर मोठ्या प्रमाणावर जाणवत असून दुध उत्पादनात मोठी तफावत जाणवू लागली अाहे. गेल्या तीन वर्षांपासून पुर्व भागाला लागोपाठ दुष्काळाला सामोरे जावे लागले अाहे. याही वर्षी तशीच परिस्थिती निर्माण झाली असून विहिरी, कुपनलिका, तलाव, घोड नदीवरील कोल्हापुर पद्धतीचे बंधारे अगदी कोरडे ठणठणीत पडले अाहेत. घोड कालव्याला नुकतेच काही दिवसांपुर्वी पिण्यासाठी पाणी सोडण्यात अाले होते. परंतु, पुरेशा दाबाने पाणी न मिळाल्याने अनेक ठिकाणची परिस्थिती "जैसे थे" च असून काही गावांना थोड्याफार प्रमाणात पाणी मिळाल्याने तात्पुरता दिलासा मिळाला होता.

उन्हाळ्याची तिव्रता मोठ्या प्रमाणावर वाढु लागल्याने परिसरातील जलस्त्रोत अाटू लागले आहेत. जनावरांच्या चा-याचा मोठा प्रश्न शेतक-यांच्या समोर उभा अाहे. शेतकरी जिवापाड जनावरांच्यावर प्रेम करत असुन या उन्हाळ्यात जगण्याचे व उदरनिर्वाहाचे एकमेव साधन म्हणून दुभत्या जनावरांकडे पाहतो. परंतु, पशु खाद्यांचे वाढलेले दर, हिरव्या चा-यांची अनुपल्ब्धता या मुळे शेतकरी  मेटाकुटीस अाला आहे. जनावरे सांभाळायची तरी कशी ? हा सवाल शेतक-यांना मोठ्या प्रमाणावर भेडसावू लागला अाहे.

दुधउत्पादकांच्या समस्या जाणुन  घेण्यासंदर्भात शिवछत्रपती दुध डेअरीचे चेअरमन राहुल कदम, इनामगावचे मधुकर घाडगे यांच्याशी भेट घेऊन  संवाद साधला असता, इनामगाव, शिरसगाव परिसरात दुधधंदा मोठ्या प्रमाणावर चालत असून दररोज २५००० लिटर दुधाचे संकलन या परिसरात होते. उन्हाची तिव्रता चांगलीच वाढू लागल्याने व उपलब्ध होणा-याचे प्रमाण पाहता दररोज संकलन केले जाणा-या दुधात मोठी घट होत आहे. हिरवा  चारा  विकत घेणे सर्वसामान्यांच्या अावाक्याबाहेरचे असून सर्वसामान्य दुधउत्पादक मोठ्या संकटात सापडला अाहे.

चा-याची व पाण्याची समस्या लक्षात घेता येत्या काही दिवसांत या परिसरात चारा छावणी सुरु करण्यात यावी, अशी मागणी यावेळी उपस्थित दुधउत्पादक व शेतक-यांनी केली.
Comment Box is loading comments...

Comment Box is loading comments...

संबंधित बातम्या