मोमिन कवठेकरांना चुकीच्या नावाचा फटका; अखेर न्याय...

कवठे यमाई, ता. 6 एप्रिल 2016 (सुभाष शेटे)- येथील जेष्ठ लोकशाहीर बी. के. मोमिन कवठेकर यांना शासनाकडून मिळणारे कलावंत मानधन केवळ अधिका-यांकडून त्यांचा मानधन प्रस्ताव पुढे मंत्रालयात पाठविताना झालेल्या चुकीने त्यांचे आडनावच बदलले गेल्याने मोठा फटका बसला. परंतु, चूक दुरुस्तीनंतर अखेर न्याय मिळाला आहे.

 गेल्या दोन वर्षांपासून त्यांना मानधना वाचून हालाखीचे जिवन व्यथित करावे लागले आहे. त्यांच्या ब्यांकेतील खात्यावर नोव्हेंबर २०१५ ला १८,५८४ रुपये मानधन जमा होवून ही केवळ आडनावात बदल झाल्याने ते त्यांना मिळू शकले नाही. ते परत संबंधित विभागाकडे गेले.

या बाबतीत संबंधित अधिका-यांकडे चुका दुरुस्त होवून मानधन मिळावे म्हणून वेळोवेळी पाठपुरावा करुन ही त्याना मानधन मिळत नव्हते. आमचे प्रतिनिधी सुभाष शेटे यांनी थेट मंत्रालयातील शासनाच्या सांस्कृतिक विभागाशी संपर्क साधत मोमिन यांच्या रखडलेल्या मानधना बाबत चौकशी केली असता मोमिन यांच्या आडनावातील चूक दुरुस्त झाल्याचे सांगितले. आज त्यांना त्यांच्या खात्यावर २६,९८४ रुपये मानधन जमा होत असल्याचे मंत्रालयातील सांस्कृतीक संचनालयाचे  अधिक्षक एम. आर. भालेराव यांनी सांगितले.

गेली ५० वर्षे आपल्या लेखणीतून विविध विषयानुरूप लेखन साहित्याची निर्मित केलेले जेष्ठ लोकशाहीर व कवी बशीर कमरुद्दीन मोमीन आज वयाच्या ७५ रीत आहेत. कलावंतांच्या विविध प्रश्नी सातत्याने पुढाकार घेत त्यांचे विविध प्रश्न त्यांनी मार्गी लावले. तमाशासाठी लागणारे वगनाट्य, गौळणी, लोकगीते, लोक जनजागृतीपर फार्स, नाटके त्यांनी आज पर्यत लिहली आहेत. कवी मोमीन कवठेकर यांच्या लेखन साहित्यावर चाकण येथील प्राध्यापकाने प्रबंध लिहित पीएचडी पदवी संपादित केली आहे. उतारवयातील अशा या अष्टपैलू जेष्ठ कलावंतास केवळ अधिका-यांच्या चुकीमुळे आडनावात बदल झाल्याने गेले २ वर्ष मानधन न मिळाल्याने हतबल व्हावे लागले. त्याना अर्धांगवायू झाल्याने ते आजारी आहेत. रखडलेले मानधन जमा होत असल्याचे सांगताच कवठेकर यांच्या चे-यावर सामाधानाची भावना दिसून आली.


शिरूर तालुक्यातील कवठे येमाई येथील वृद्ध कलावंत बशीर कमरुद्दीन मोमीन यांचे मानधन प्रस्तावात आडनावात बदल होवून शेख आडनावाने प्रस्ताव सांस्कृतिक संचनालयाकडे सादर करण्यात आला होता. चुकीच्या दुरुस्तीसाठी लागनारी कागदपत्रे आमच्या विभागाकडे प्राप्त झाली आहेत. मोमिन यांच्या बॅंक खात्यावर त्यांचे रखडलेले कलावंत मानधन रुपये २६,९८४ /- ६ एप्रिललाच तातडीने जमा होणार आहे.
- एम. आर. भालेराव
अधिक्षक, सांस्कृतिक संचनालय, मंत्रालय, मुंबई.

Comment Box is loading comments...

संबंधित बातम्या