शंभू भक्तांनी दुमदुमले वढू बुद्रुक

वढू बु., ता. ८ एप्रिल २०१६ (विशेष प्रतिनीधी) : येथे  धर्मवीर संभाजी महाराजांची ३२७ वी बलिदानस्मरण दिनानिमित्त अभिवादन करण्यासाठी हजारोंच्या संख्येने शंभू भक्तांनी गर्दी केल्याने वढुबुद्रुक चांगलेच दुमदुमन गेले होते.

धर्मवीर संभाजी महाराजांच्या समाधिस्थळावर सकाळी साडेअकरा वाजता हेलिकॉप्टरने पुष्पवृष्टी करण्यात आली.त्यानंतर समाधिस्थळावर पोलिसांनी शासकीय मानवंदना दिली.समाधिस्थळावर आपटी ते वढू बुद्रुक पालखी सोहळ्याचे आगमन झाल्याने सर्वत्र  भक्तिमय वातावरण निर्माण झाले होते. ज्ञानोबा-माउली-तुकाराम व छत्रपती संभाजीराजांच्या जयघोषाने संपुर्ण परिसर दुमदुमून गेला होता.धर्मवीर छत्रपती संभाजीराजे युवा मंचच्या वतीने शंभुभक्तांच्या महाप्रसादाची व्यवस्था करण्यात आली होती. यानिमित्त रक्तदान शिबिरही घेण्यात आले.या वेळी आमदार बाबूराव पाचर्णे, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी कांतिलाल उमाप, बांधकाम सभापती मंगलदास बांदल, तहसीलदार राजेंद्र पोळ, गटविकास अधिकारी संजय चिल्लाळ, पंचायत समिती सदस्य भगवानराव शेळके, वढू बुद्रुकचे सरपंच सुनीता भंडारे, उपसरपंच संतोष शिवले, सचिन भंडारे, रमाकांत शिवले, आदी उपस्थित होते.

या वेळी परिसरातील व तालुक्याच्या विविध भागातुन मोठ्या प्रमाणावर दिंड्या अाल्या होत्या.तसेच पोलीसांनी देखील चोख बंदोबस्त ठेवला होता.

शंभुभक्तांनी उन्हाचा कडाका  मोठ्या प्रमाणावर असुन देखील दर्शनासाठी तुडुंब गर्दी केल्याने संपुर्ण परिसर गर्दीने फुलुन गेला होता.

Comment Box is loading comments...

Comment Box is loading comments...

संबंधित बातम्या