रोहिणी विरोळे-पाटील यांची शासकीय पदे मिळविण्यात हॅटट्रिक

शिक्रापूर, ता. 3 जून 2018: सासर शिक्रापूर व माहेर पाबळ अशा दोन्ही ग्रामस्थांना रोहिणी विरोळे-पाटील यांनी सुखद धक्का देत  शासकीय पदे मिळविण्यात हॅटट्रिक केली आहे. नायब तहसीलदार ते उपजिल्हाधिकारी अशा सलग तीन वर्षांच्या यशस्वी प्रवास आहे.

पाबळ (ता. शिरूर) येथील दत्तात्रेय धोंडीबा नऱ्हे यांची कन्या व शिक्रापूरातील तंटामुक्त समितीचे माजी अध्यक्ष उद्योजक मोहनशेठ विरोळे पाटील यांच्या स्नुषा असलेल्या रोहिणी योगेश विरोळे-पाटील यांनी सन 2016 मध्ये 396 गुण मिळवत राज्यात मुलींमध्ये प्रथम क्रमांक पटकावला. पुढे सन 2017 मध्ये तहसीलदार पदाच्या परीक्षेत 494 गुण मिळवत मुलींमध्ये राज्यात तिसरा क्रमांक पटकावला. सलग दोन वर्षांच्या भरीव यशानंतर विरोळे-पाटील यांनी सलग तिसऱ्या वर्षीच्या लोकसेवा आयोगाच्या उपजिल्हाधिकारी पदाच्या परीक्षेत मुलींमध्ये राज्यात प्रथम क्रमांक पटकावला असून, त्यांच्यावर कौतुकाचा वर्षाव होत आहे.

संसार सांभाळत 'त्या' झाल्या नायब तहसिलदार!
शिक्रापूर, ता. १२ एप्रिल  २०१६ (प्रतिनीधी) : येथील रोहिणी योगेश विरोळे-पाटील यांनी संसारिक जबाबदारी सांभाळत जिद्दीच्या जोरावर नायब तहसिलदारपदापर्यंत मजल मारत महाराष्ट्रात मुलींमध्ये प्रथम येण्याचा मान पटकाविला अाहे.

लग्न झालं कि चुल अन् मुल यातचं महिलांचं अायुष्य गुरफटुन जातं असं म्हटलं जातं. परंतु, या जुन्या सर्व विचारांना झुगारत नायब तहसिलदारपदाला त्यांनी गवसणी घातली अाहे.

शिक्रापूरच्या रोहिणी विरोळे यांचं माहेर पाबळचं. अभियांत्रिकेचं उच्च शिक्षण घेतलेल्या रोहिणी या बी.टेक अाहेत. सुरुवातीपासूनच जिद्दी असणा-या रोहिणी यांना  लग्नानंतरही शिक्षण चालू ठेवण्यासाठी पती योगेश, शिक्रापूर तंटामुक्त समितीचे अध्यक्ष मोहन विरोळे, सासूबाई मंदाकिनी यांनी भक्कम पाठबळ दिले. यांनी शिक्षण व संसार याचा मेळ घालत पुण्यातील एका कंपनीत सॉफ्टवेअर अभियंता म्हणून नोकरी काही काळ नोकरी केली. त्याचबरोबर हा सर्व व्याप सांभाळून महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या परीक्षांची तयारी देखील सुरू ठेवली.

सलग तीन वर्षांच्या अथक प्रयत्नांनंतर चालू वर्षी ३९६ गुण प्राप्त करीत  महाराष्ट्रात मुलींमध्ये पहिला येण्याचा मान त्यांनी पटकावला अाहे. त्याचबरोबर नायब तहसीलदारपदाला गवसणी घातली अाहे. त्यांच्या या यशाबद्दल शिक्रापूर ग्रामस्थांकडून व परिसरात कौतुकाचा वर्षाव केला जात अाहे.
Comment Box is loading comments...

Comment Box is loading comments...

संबंधित बातम्या