मलठण येथे रामजन्मोत्सव सोहळ्याचे अायोजनः जामदार

मलठण , ता. १४ एप्रिल २०१६(प्रतिनीधी) :  येथे नव्यानेच स्थापन झालेल्या स्वराज्य, कला, क्रीडा, आरोग्य, सांस्कृतिक, धार्मिक प्रतिष्ठानच्या वतीने आज (ता. १५) पासून ते २२ एप्रिल २०१६ पर्यंत भव्य श्री राम नवमी सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे, अशी माहिती प्रतिष्ठाणचे  अध्यक्ष गणेश जामदार यांनी दिली.

मलठण येथील वीर हनुमान मंदिरात आगामी श्री राम नवमी सोहळ्याचे निमित्ताने प्रतिष्ठानच्या वतीने विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. आज येथील मल्लिकार्जुन मंदिरात सकाळी १० ते १२ पर्यंत  ह भ प शिवाजी महाराज जाधव यांचे श्री राम जन्माचे कीर्तन होणार आहे. सायंकाळी ७ वाजता रामायण कथा सप्ताहास सुरुवात होणार आहे. ता. २२ ला ग्रामस्थांच्या वतीने वीर हनुमान जन्मोत्सव साजरा करण्यात येणारा  आहे. समस्त वारकरी सांप्रदायाच्या वतीने या कार्यक्रमाचे संयोजन करण्यात येणार आहे. या प्रसंगी शिरूरचे तहसिलदार राजेंद्र पोळ, पोलिस निरीक्षक भगवान निंबाळकर, सहायक पोलिस निरिक्षक उत्तम भजनावळे, मनोज नवसरे आदी उपस्थित राहणार  आहेत.

मलठण येथील तरुणांच्या एकत्रित विचारांतून गावचा  विविध क्षेत्रातून सर्वांगीण नाव लौकिक  व्हावा व गावाच्या विकासास हातभार लागावा या हेतुने  स्वराज्य, कला, क्रीडा, आरोग्य, सांस्कृतिक, धार्मिक प्रतिष्ठानच्या माध्यमातून कार्य करणार आहे, असे जामदार यांनी सांगितले.
Comment Box is loading comments...

Comment Box is loading comments...

संबंधित बातम्या