...त्यांनी केले मरणोत्तर अवयवदान!

पिंपळे खा., ता.१७ एप्रिल २०१६ (प्रतिनीधी) : येथील राजेंद्र दिनेशचंद्र पोळ यांचा नुकताच अपघातात मेंदूला गंभीर मार लागल्याने मृत्यू झाला होता.परंतु नातेवाइकांच्या व कुटुंबियांच्या  पुढाकाराने त्यांचे मरणोत्तरअवयवदान करण्यात आले अाहे.

या संदर्भात मिळालेल्या माहितीनुसार,राजेंद्र दिनेशचंद्र पोळ यांना दुचाकीस्वाराने धडक दिल्याने पुण्यात रुग्णालयात दाखल करण्यात अाले होते.त्यांच्या डोक्‍याला गंभीर दुखापत झाली होती.त्यावेळी उपचाराअंती रुग्णालयातील मेंदूतज्ज्ञ डॉक्‍टरांनी त्यांचा मेंदू मृत झाल्याचे जाहीर केले व राजेंद्र हे काही तासांचे जीवनसाथी असल्याचे डॉक्‍टरांनी नातेवाइकांना सांगितले याचवेळी दिवंगत पोळ यांची आतेबहीण डॉ. वैशाली कणसे, जिवलग मित्र सोमेश्वर साखर कारखान्याचे माजी अध्यक्ष राजवर्धन शिंदे व विधान परिषदेचे उपसभापती वसंतराव डावखरे यांचे स्वीय सहायक बाळासाहेब शेळके यांनी दिवंगत पोळ यांच्या अवयवदानाचा निर्णय घेतला.

पोळ यांचे बंधू संजय,हर्षद,त्यांची पत्नी रोहिणी,संकेत व रितू या मुलांनी अवयवदानाचा निर्णय अंतिम केला आणि राजेंद्र यांच्या मृत्यूनंतर अवयवदानाची कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करून मृतदेह सर्व कुटुंबांनी ताब्यात घेतला.

या वेळी कुटुंबियांशी संपर्क साधला असता हेल्मेट घातले असते तर असा दुर्दैवी प्रसंग ओढवलाचं नसता व जीव वाचला असता असे सांगितले.

Comment Box is loading comments...

Comment Box is loading comments...

संबंधित बातम्या