'एमपीएससीतील' गुणवंताचा मान्यवरांच्या हस्ते सत्कार

शिरूर, ता.१७ एप्रिल २०१६ (विशेष प्रतिनीधी) :नुकत्याच झालेल्या एमपीएससी परिक्षेत उज्जवल यश प्राप्त करणा-या तालुक्यातील यशस्वितांचा शिरुरकरांकडुन नुकताच जंगी सत्कार करण्यात  अाला.

शिक्रापूर येथील सौ.रोहिणी योगेश विरोळे यामहाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या परीक्षेत राज्यात मुलींमध्ये प्रथम आलेल्या होत्या. तसेच निर्वी येथील सुजित कैलास वाबळे, पिंप्री जलसेन (ता.पारनेर) येथील डॉ. अरविंद पोपट घेमुड या गुणवंतांना शिरूरकर नागरिक व "स्पर्धा परीक्षा गुणवंत सन्मान सोहळा समिती'च्या वतीने दिलीप वळसे पाटील यांच्या हस्ते पुस्तकांचा संच, शाल व पुष्पगुच्छ देऊन नुकतेच गौरविण्यात आले.

या सोहळ्याला आमदार बाबूराव पाचर्णे,माजी आमदार सूर्यकांत पलांडे व पोपटराव गावडे, घोडगंगा चे संचालक प्रकाश पवार,दादा पाटील फराटे,उद्योजक सदाशिव पवार, बाजार समितीचे उपसभापती मानसिंग पाचुंदकर,मोहनशेठ विरोळे, शिक्रापूरच्या अंजनाताई भुजबळ,बाभुळसरचे सरपंच दशरथ फंड, नामदेवराव घावटे, अशोक सावंत, पोलिस निरीक्षक भगवान निंबाळकर आदी उपस्थित होते. या वेळी वळसे पाटील म्हणाले,  नव्याने प्रशासनात आलेल्यांनी आपल्याला आलेल्या अडचणींची जाणीव ठेवून अडचणीतील घटकाला मदतीची भूमिका घ्यावी. शेतकरी समाजातून आलेल्यांनी शेतकरी व शेतीच्या उन्नतीला प्राधान्य द्यावे. प्रशासनाचे सुशासन करण्याला प्राधान्य द्या. धोरणे ठरविताना सामाजिक बांधिलकीची जाण ठेवा.''असे सांगत मार्गदर्शन केले.

यावेळी बोलताना आमदार पाचर्णे म्हणाले कि,ग्रामीण भागाच्या पायाभूत विकासासाठी ग्रामीण भागातील तरुण प्रशासनात गेले पाहिजेत,त्यासाठी प्रयत्न होणे गरजेचे असल्याचे मत त्यांनी या वेळी व्यक्त केली.

या कार्यक्रमाला बाबूराव पाचंगे यांनी स्वागत,रवींद्र धनक यांनी प्रास्ताविक; तर संजय बारवकर यांनी सूत्रसंचालन केले. एच. पी. ढवण यांनी आभार मानले.
Comment Box is loading comments...

Comment Box is loading comments...

संबंधित बातम्या