जलसंधारणाची कामे मार्गी लावणार-राजेंद्र पोळ

मलठण , ता. १७ एप्रिल २०१६(सुभाष शेटे) :  सध्याच्या  दुष्काळी पार्श्वभूमीवर मलठण गाव शासनाच्या जलयुक्त शिवार अभियानात घेतलेले आहे.यातून आगामी दीड महिन्यात या परिसरात विविध जलसंधारनाची कामे मार्गी लावणार असल्याचे तहसिलदार राजेंद्र पोळ यांनी येथे रामनवमी उत्सवाच्या निमित्ताने बोलताना सांगितले.या सप्ताहाचा प्रारंभ  टाकळी हाजी चे पोलिस उपनिरिक्षक मनोज नवसरे व पोळ यांच्या हस्ते दीप प्रज्वलन करून करण्यात आला.

या वेळी वारकरी संप्रदायाचे सचिव बाळासाहेब गायकवाड,सुहास थोरात,कृष्णाजी शिंदे,बाळासाहेब नेवासकर ,अॅडव्होकेट संदीप शिंदे,प्रतिष्ठान चे अध्यक्ष गणेश जामदार व त्यांचे सर्व सहकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
   
पुढे बोलताना पोळ म्हणाले कि,रामनवमीच्या निमित्ताने स्वराज्य प्रतिष्ठानने सुरु केलेला रामायण कथा सप्ताह उपक्रम निश्चितच कौतुकास्पद असुन येथील विठ्ठल रुख्मिणी मंदिर जीर्णोद्धार कामी सर्वांचा सहयोग  महत्वाचा आहे.तसेच राज्यात गेल्या २-३ वर्षांपासून तालुक्यावर दुष्काळाची छाया आहे. दुष्काळी पार्श्वभूमीवर मलठण गाव शासनाच्या जलयुक्त शिवार अभियानात घेतलेले असुन आगामी दीड महिन्यात परिसरात विविध जलसंधारनाची कामे मार्गी लावणार असल्याचे त्यांनी सांगितले तसेच जलयुक्त शिवार अभियान येथे प्रभावी राबविण्यात येणारा असून या कामी स्थानिक ग्रामस्थांचा सक्रिय सहभाग असणे अत्यंत महत्वाचे आहे असेही ते यावेळी म्हणाले.
नव्यानेच स्थापन केलेल्या स्वराज्य,कला,क्रीडा,आरोग्य,धार्मिक,सांस्कृतिक प्रतिष्ठान च्या माध्यमातून कथाकार रामायणचार्य हरी भक्त पारायण महादेव महाराज जाधव (अहमदनगर) यांच्या किर्तनाने प्रारंभ करण्यात अाला असुन येथील वीर हनुमान मंदिरा समोरील प्रांगणात या रामायण कथा सप्ताहाचे आयोजन करण्यात आले आहे.

शुक्रवार ता.१५ ते २२ असा हा कथा सप्ताह होणार असून हनुमान जयंतीस सप्ताहाची सांगता होणार असल्याचे स्वराज्य प्रतिष्ठान चे अध्यक्ष गणेश जामदार यांनी सांगितले.
    
Comment Box is loading comments...

Comment Box is loading comments...

संबंधित बातम्या