शिरुरकरांची तहाण भागणार!

शिरूर, ता.१९ एप्रिल २०१६ (मुकुंद  ढोबळे) : घोडनदीतील बंधार्‍यात पाणी आल्याने शहराला होणारा पाणीपुरवठा काल सुरळीत करण्यात अाला असल्याचे नगराध्यक्षा सुवर्णा लोळगे यांनी बोलताना सांगितले.तर घोडनदीत पाणी पोहोचल्याने शिरुरकर मात्र चांगलेच सुखावले अाहेत.
 
शिरुर शहराला पाणीपुरवठा करणारा बंधारा व जॅकवेल कोरडा पडल्याने आठवडाभरापासून शहरात पाणीपुरवठा ठप्प झाला होता.पाण्यावाचुन शिरुरकरांचे देखील भलतेच हाल होत होते. दरम्यान नगरपालिकेसह शिवसेना, राष्ट्रवादी तसेच शिरुर शहरातील काहि दानशुरांनी टंचाइ काळात पाण्यासाठी टॅंकर उपलब्ध करुन दिले होते.तर दुसरीकडे पाण्यावरुन राजकारण देखील सुरु होते.परंतु घोडनदीवर असणा-या वरील बंधार्‍याचे ढापे काढून पाणी खाली आणण्यासाठी गेली अाठवडाभर नगर परिषदेने प्रयत्न केले.अखेर पाणी काल रात्री बंधार्‍यात पोहोचले. पाणी पोहोचल्याचे कळताच शिरुरकरांसह अनेक ग्रामस्थांना यावेळी अानंद झाला असुन काल दिवसभर व्हॉट्सअप व सोशल मिडियावर पाणी पोहोचल्याची चर्चा सुरु होती.


यासंदर्भात नगराध्यक्षा सुवर्णा लोळगे यांची भेट घेतली असता,सध्या शहरात काहि भागात पाणीपुरवठा सुरु झाला असुन हळुहळु सर्व भागात पाणी पोहचले जाइल.तसेच समस्या पुन्हा उद्भवु नये व खबरदारीचा उपाय म्हणुन दोन दिवसाअाड पाणी होणार असल्याचे त्यांनी यावेळी बोलताना सांगितले.दरम्यानच्या काळात ज्या संस्था व व्यक्तींनी पाणी पुरवठ्यासाठी श्रम घेतले त्या सर्वांचे अाभार नगराध्यक्षा लोळगे यांनी अाभार मानले अाहे.तसेच सभागृह नेते प्रकाश धारिवाल  यांच्या मार्गदर्शनाखाली  पाण्याचे योग्य नियोजन सुरु असल्याचे देखील त्यांनी सांगितले.पाण्याचा काटकसरीने नागरिकांनी वापर करावा असे अावाहन सुवर्णा लोळगे यांनी केले अाहे.
यावेळी झालेल्या बैठकिस मुख्याध्याधिकारी डॉ. विजय थोरात, अशोक पवार  अादी मान्यवर उपस्थित होते.

Comment Box is loading comments...

Comment Box is loading comments...

संबंधित बातम्या