कवठे परिसरातील नदीकाठचा वीजपुरवठा पुर्ववत

कवठे यमाई,  ता. २० एप्रिल २०१६ (सुभाष शेटे) : शिरूर शहराला पाणी पुरवठा करणा-या बंधा-यात पाणी पोहचल्याने या परिसरातील  नदीकिनारी ठेवण्यात आलेला ३ तासाचा वीजपुरवठा पुर्ववत करण्याच्या सुचना  वीजमंडळाच्या टाकळीहाजी उपविभागीय कार्यालयास देण्यात आल्या असल्याचे शिरूरचे तहसिलदार राजेंद्र पोळ यांनी सांगितले  . 

सध्या टंचाई आवर्तन सुरु असुन ते पाणी शिरूर तालुक्यातील डिंभा उजव्या कालव्या लगतच्या गावांना व शिरूर शहर व ग्रामिण भागासाठी फक्त पिण्यासाठीच देण्यात येणार अाहे. या सोडलेल्या पाण्याचा दुरुपयोग होऊ नये म्हणून घोडनदीपात्रा लगतचा वीज पुरवठा फक्त पिण्याच्या पाण्याचा पुरवठा करण्यासाठी ३ तासच ठेवण्याचा अादेश तहसिलदारांनी दिला होता.

शिरूर शहराला पाणी पुरवठा करणा-या बांधा-यात हे पाणी पोहचले असल्याने नदी किनारी असणा-या पिण्याच्या पाण्याच्या योजनांसाठी पूर्वी प्रमाणेच वीजपुरवठा  करण्याच्या सुचना शिरूरचे तहसिलदार राजेंद्र पोळ यांनी दिली  असल्याची माहिती वीज मंडळाच्या शिरूर कार्यालयाचे प्रमुख नितिन महाजन व  टाकळी हाजी कार्यालयाचे सहायक अभियंता बाळासाहेब टेंगले यांनी दिली . 

Comment Box is loading comments...

Comment Box is loading comments...

संबंधित बातम्या